प्रतिनिधी /पुणे
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी मी तीन सामने खेळले. त्यामुळे शारीरिक वेदना अधिक होत होत्या. दुसऱ्या दिवशी एक ब्रांझ पदक पटकाविले. पंरतु, मिश्र्र दुहेरीमध्ये रोहन बोपन्ना यांच्यासोबत खेळत असताना, त्यांनी केलेले योग्य मार्गदर्शन व माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाने मला माझी क्षमता समजली आणि मी खेळात कमबॅक करू शकले, असे सांगत, मी आता आगामी ऑलिम्पिकचे ध्येय बाळगले असल्याचे मत आशियाई टेनिस मिक्स डबल सुवर्णपदक विजेती ऋतुजा भोसले हिने गुऊवारी येथे व्यक्त केले. पुणे श्र्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप प्रसंगी ती बोलत होती. यावेळी संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सरचिटणीस सुकृत मोकाशी आणि महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशनचे मानद सचिव सुंदर अय्यर उपस्थित होते.
ऋतुजा म्हणाली, ‘टेनिस सोडून अमेरिकेला शिक्षणासाठी गेल्यावर मला जाणीव झाली, कि मला टेनिस मध्येच करियर करायचेय देशासाठी मेडल जिंकायचय. पण हे माझ्यासाठी सोपे नव्हते. 2-3 वर्षांनंतर अमेरिकेतून पुन्हा भारतात येवून मला टेनिसची शुन्यातून पुन्हा सुऊवात करावी लागली. त्यासाठी मी खूप मेहनत घेतली. यावषीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मिश्र्र दुहेरीसाठी रोहनने माझी निवड केली तेव्हा खूप आनंद झाला. अंतिम सामन्यात पहिला सेट आम्ही हरलो. त्यावेळी रोहनने केलेले मार्गदर्शन आणि दिलेल्या प्रोत्साहनामुळे आम्हाला सहज सुवर्णपदक पटकावित राष्ट्रगीत व तिरंगा परदेशात फडकवता आला तो क्षण माझ्यासाठी खूप भावनिक होता.’









