ही स्थिती टाळण्यासाठी खर्चावर नियंत्रण मिळवा
सध्या अनेक लोकांचा खर्च हा कमाईपेक्षा अधिक होत आहे. अशा स्थितीत घर चालविणे, मुलांचे शिक्षण, उपचाराचा खर्च, निवृत्तीनंतरची चिंता एका ट्रॉमाच्या दिशेने नेत असते. याला लॉस एंजिलिसमधील वित्ती मनोवैज्ञानिक केंद्राचे संस्थापक एलेक्स मेलकुमियन यांनी फायनान्शियल ट्रॉमा हे नाव दिले आहे.
ज्या आर्थिक अडचणी आमच्या मानसिक शांततेला धक्का पोहोचवितात, त्या फायनान्शियल ट्रॉमाच्या दिशेने नेत असतात. सद्यकाळात हा सर्वात धोकादायक ट्रॉमा असून तो पीडितावर नकारात्मक प्रभाव पाडून त्याला पुढील वाटचालीपासून रोखतो. हा पोस्ट-ट्रॉमेटिक स्ट्रेस डिसऑर्डर (पीटीएसडी) दर्शवित असल्याचे एलेक्स यांचे सांगणे आहे.
नैराश्यातही होते वाढ
फायनान्शियल ट्रॉमा हा दैनंदिन तणावासारखा कमी होत नाही किंवा वाढत नाही, उलट पीडिताच्या कमाईवर प्रतिकूल प्रभाव पाडतो. ज्या व्यक्तीने मोठे नुकसान झेलले आहे, तो स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास घाबरू शकतो. ही मसया एखाद्या आनुवांशिक आजाराप्रमाणे पिढ्यानपिढ्या पुढे जात राहू शकते. यामुळे नैराश्यासारखी समस्या वाढत असल्याचे फायानान्शियल थेरपिस्ट थॉमस फाफुल यांनी सांगितले आहे. परंतु पीटीएसडीप्रमाणे हा मानसिक आजार नी, यामुळे आर्थिक सल्लागार किंवा थेरपिस्टकडून मदत घेत त्यावर मात करता येते अनेक लोकांना पैशांबद्दल मोठा मोह असल्याने मानसिक आरोग्याला मुकावे लागते, परंतु हा प्रकार ते लपवून ठेवतात. 25 टक्के अमेरिकन लोक पीटीएसडीने ग्रस्त आहेत.

खर्चावर नियंत्रण आणा
फायनान्शियल ट्रॉमापासून वाचण्यासाठी खर्चावर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. याकरता अधिक खर्च करविणारे अॅप किंवा ऑनलाइन स्टोअरमधून स्वत:चे क्रेडिट कार्ड हटविण्यात यावे. अधिक खर्चाची सवय असलेल्या लोकांनी काहीसा कमी खर्च करत सुरुवात करावी. याच्या अंतर्गत महागडी पादत्राणे, कपडे खरेदी करण्यापूर्वी त्यांच्या उपयुक्ततेविषयी विचार केला जाऊ शकतो. पैसे वाचविण्यासाठी सॅलरी खात्यासोबत आणखी एक बचत खाते बाळगावे. यात दर महिन्याला काही रक्कम टाकावी, जेणेकरून संकटकाळात ती उपयोगी पडू शकेल असे तज्ञांनी म्हटले आहे.
वर्तनातील बदल
फायनान्शियल ट्रॉमाने पीडित लोक पैशांप्रकरणी टाळाटाळ करू लागतात. असे लोक खरेदीनंतर बिलाविषयी चर्चा करणे टाळतात. ते कधीच कुठल्याही गोष्टीसाठी बजेट ठरवत नाहीत. जेथे खर्च करणे आवश्यक आहे, तेथे पैसे वाचवू पाहतात. अशा स्थितीत पैसे वाचविण्यापेक्षा ते अधिक स्वत:चे आर्थिक संकट लपविण्याचा प्रयत्न करत असल्याचे तज्ञांचे सांगणे आहे.









