कोल्हापूर / विद्याधर पिंपळे :
तरतरी ,चव, स्वाद असलेले पेय म्हणजे कॅफी. कोल्हापूरात ही इन्स्टंन्ट कॉफीची मागणी वाढत असून, शहरात कॉफी शॉपीची क्रेझ वाढत चालली आहे. आज कॉफी आता युवा वर्गामध्ये ग्लॅमर व एक फॅशन बनू लागली आहे. चहाची जागा आता इन्स्टंन्ट कॉफीने घेतली आहे.
पाहुण्यांचे आदरतिथ्य हे चहानेच होत असते. 70 टक्के लोकांचा दिवस चहाशिवाय होत नाही. पण कांही लोकानां आता कडवट फेसाळ इन्स्टंट कॉफीची सवय झाली आहे. यामध्ये साधी उकळणारी कॉफी तर दुसरी इन्स्टंट कॉफी असा प्रकार आहे. आज आयटी ,कार्पोरट क्षेत्रातील युवा पिढी आता इन्स्टंट कॉफीला पहीली पसंती देऊ लागले आहेत. यामुळे कोल्हापूरात इन्स्टंट कॉफीची मागणी वाढत आहे. आज दरमहा 500 किलो इन्स्टंट कॉफीसाठीचे बीन बी विकले जात आहे.त्याच बरोबर कॉफी शॉपची संख्या ही वाढत चालली आहे.
- परवडणाऱ्या इन्स्टंट कॉफी पाऊच्या मागणीत वाढ
पूवीं इन्स्टंट कॉफी बरणीमध्ये येत असे.या बरणीची किंमत जास्त असल्याने, तसेच ही कॉफी घट्ट होत असे. त्याऐवजी कांही कंपन्यांनी एक रूपया मध्ये हे पाऊच बाजारात आणले. आता दोन रूपयाला मिळत आहे. स्वस्तात मस्त असलेल्या इन्स्टंट कॉफी आता सर्वसामान्य माणूस ही आता वापरू लागला आहे. इन्स्टन्ट कॉफी पाठोपाठ आता कॉफी शॉपची संख्या कोल्हापूरात वाढू लागल्या आहेत. बीन चे भजलेले बी व बी दळण्यासाठी कॉफी मेकर मशिन मशिनची गरज असते. या मशिनची किंमत लाखो रूपये किंमतीचे आहेत.
- दरवषीं 4 लाख टन इन्स्टंन्ट कॉफीची निर्यात
देशात केरळ,कर्नाटक व तामिळनाडु येथे बीन चे पिक घेतले जाते. भारतात दरवर्षी चार लाख टन इन्स्टंन्ट कॉफीची निर्यात होत असून, जगात भारत हा हे पिक घेण्यामध्ये सहाव्या क्रमांकाचे आहे.. केंट कॉफी ही भारतीतील सर्वात जुनी कॉफी आहे.
एक एक्रमध्ये 2.5 ते 3 क्विंटल कॉफी बी तयार होते. 29 सप्टेंबर 1983 ला जपानमध्ये ऑल जपान कॉफी असोसिएशनने आंतरराष्ट्रीय कॉफी दिन सुरू केला आहे. आज इन्स्टंट कॉफी पाठोपाठ काफी शॉपची फ्रॅचायशी साखळीचे जाळे कोल्हापूरात पसरू लागले आहे.
- शहरात इन्स्टंट कॉफी आणि कॉफी शॉपची वाढते जाळे
पूर्वी उकळलेल्या कॉफीची मागणी होती. याच दर ही कमी होता. पण आता बीन बी च्या दळलेल्या, इन्स्टंट कॅफीची मागणी वाढली आहे. त्याचबरोबर कॉफी शॉपची संख्या ही कोल्हापूरात वाढत चालली आहे. बीन वी व कॉफी मेकर मशिनच्या भांडवलावर हा व्यवसाय वाढत आहे. या इन्स्टंट कॉफीचा दर 100 पासून 200 रूपयापर्यंत आहे.
-नवनीत मूग, होलसेल कॉफी विक्रेते
महीन्यापुवीं खाद्यतेलाच्या दरात किलोमागे पाच ते सहा रूप्यांनी वाढ झाली होती. हाच दर आता टिकून आहे. सद्यस्थितीत खाद्यतेलाचे दर किलोप्रमाणे आहेत. सरकी 156,सुर्यफूल 174, शेंगतेल 186 रूपये.
- धान्य-कडधान्याचे दर स्थिर
धान्य बाजारामध्ये धान्य-कडधान्याच्या दरात कोणतीच चढ-उतार झालेली नाही. याचे दर पुढील प्रमाणे आहे.
तूरडाळ:120,मूगडाळ,120,हरभराडाळ:90,उडीदडाळ:140,मसूरडाळ:100,छोले:140 ते 160, मूग:120, मसूर:100,बेळगांवी मसूर:260,हिरवा वाटाणा:140,काळा वाटाणा:100, चवळी:140,मटकी:160,हरभरा:80
किराणा दर
सद्या गव्हाचा व ज्वारीचे दर स्थिर आहेत. प्रतवारीनुसार गहू 40 ते 44 तर ज्वारी 44 ते 58 रूपये असा दर आहे. गूळ: 55,शाबू:54,शेंगदाणे 130 ते 140, रवा: 44,मेदा:44,आटा:44 रूपये असा आहे.
- या आठवडयात सोने-चांदी दर
दिनांक (मे) सोने चांदी
21 97900 100400
22 98900 100600
23 99300 100000
26 98700 100600
27 98000 99700








