प्रतिनिधी,कोल्हापूर
Kolhapur Crime News : शिंगणापूर येथील ऋषीकेश उर्फ संभा महादेव सुर्यवंशी याच्या मारेकऱ्यांना 24 तासामध्ये जेरबंद करण्यात पोलीस प्रशासनास यश आले आहे. ऋषीकेशचा खून आर्थिक वादातून झाला असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितला असले तरी या मागे अनैतीक संबंधाचा कारण असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी करवीर पोलिसांनी एका महिलेचीही चौकशी केली असल्याची माहिती या प्रकरणी ऋषभ विजय साळोखे (वय 21 रा. हरिमंदिर, रामानंदनगर),सोहम संजय शेळके (वय 20 रा.गजानन महाराज नगर),गणेश लिंगाप्पा यलगुट्टी (वय 20 रा.अमृतनगर,गिरगांव रोड पचागांव),अथर्व संजय हावळ (वय 20 रा. कुंभारगल्ली,शाहू उद्यान मागे,गंगावेश) यांना करवीर पोलिसांनी अटक केली.शनिवारी सकाळी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,गुरुवारी पाचगांव येथील जगताप कॉलनी परिसरातील निर्जन माळावर ऋषिकेश महादेव सुर्यवंशी (वय 25 रा.शिंगणापू ता.करवीर) याचा डोक्यात दगड घालून तसेच चाकूने वार करुन निर्घुण खून करण्यात आला होता.या प्रकरणाचा पोलीसांनी 24 तासामध्ये उलगडा करुन चौघांना जेरबंद केला.
एका गाडीवरुन तिघेजण
बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मृत ऋषिकेश,अथर्व व गणेश हे तिघे गंगावेश चौकामध्ये एकत्र भेटले.यावेळी ऋषीकेशला त्यांनी आपल्या मोपेडवर बसवून एका बारमध्ये नेले.त्या ठिकाणी तिघांनीही भरपूर मद्यप्राशन केले.यानंतर तिघेही आणखी दारु घेवून पाचगांवच्या दिशेने गेले.याचदरम्यान अथर्व व गणेशने ऋषभव सोहमला घटनास्थळी आणखी दारु घेवून येण्यास सांगितले.पाचही जण या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांनी पुन्हा दारु पिण्यास सुरुवात केली.यामध्ये ऋषीकेशसोबत गणेश व अथर्वची झटापट झाली यातून गणेशने ऋषीकेशच्या डोक्यात दगड घातला तर ऋषभने त्याच्यावर चाकूने वार केले.रात्री 11 वाजण्याच्या सुमारास खूनाची घटना घडली.
आयटीआय समोरील हॉस्टेलचा आधार
खून केल्यानंतर गणेश,अथर्व,ऋषभ,सोहम हे आयटीआय समोरील एका हॉस्टेलमध्ये मित्राकडे थांबले होते.गणेश व अथर्वने या ठिकाणी कपडे बदलून मोपेड घेवून हे पसार होण्याच्या तयारीत होते.त्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने शिये येथून जेरबंद केले.तर ऋषभ व सोहम यांना नाळे कॉलनी येथून जेरबंद केले.
लास्ट कॉलमुळे गुह्याचा उलगडा
बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास अथर्वने ऋषीकेशला मोबाईलवरुन संपर्क साधला होता.या दोघांचे वारंवार फोनवरुन संभाषण सुरु होते.संशयीत आरोपींच्या कॉल डिटेल्सवरुन खुनाच्या गुह्याचा उलगडा होण्यास मदत झाली.
अथर्वच्या आईचा आत्महत्येचा प्रयत्न
अथर्वचे नांव ऋषीकेशच्या खूनामध्ये समोर आले.गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास करवीर पोलीस ठाण्याचे एक पथक अथर्वच्या घरी गेले.त्याच्या आई व वडीलांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यामध्ये बोलविले.यावेळी त्यांना सांगण्यात आले की एका खूनप्रकरणातील संशयीतांमध्ये तुमच्या मुलग्याचे नांव आहे.हे एेकून अथर्वच्या नातेवाईकांना धक्का बसला.सायंकाळपर्यंत या सर्वांना पोलीस ठाण्यामध्ये चौकशीसाठी थांबविण्यात आले.सायंकाळी घरी आल्यानंतर अथर्वच्या आई शिल्पा संजय हावळ यांनी विषारीद्रव्य प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.त्यांना तात्काळ नातेवाईकांनी सिपीआर रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
करवीर,एलसीबी पोलिसांचे संयुक्त यश
करवीर पोलीस उपअधिक्षक संकेत गोसावी,पोलीस निरीक्षक अजय सिंदकर,स्थानिक गुन्हे अन्वेषणनचे संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सुभाष सरवडेकर,सुजय दावणे योगेश शिंदे,अमोल चव्हाण,दिलीप घाटगे,विजय पाटील,अशोक मंत्रे,स्थानिक गुन्हे अन्वेषणचे अजीत वाडेकर,सहाय्यक फौजदार सुनिल कवळेकर, ओंकार परब,प्रशांत कांबळे,विनायक चौगुले,संजय कुंभार यांनी हा तपास केला.
मैत्रिणीची चौकशी सुरु
ऋषीकेशचे एका महिलेशी अनैतीक संबंध होते.याची माहिती संबंधीत महिलेच्या पतीस मिळाली होती.यातून या पती पत्नीमध्ये वाद होते.गेल्या दोन वर्षापासून संबंधीत महिलेचा पती तीच्यापासून लांब राहत आहे.यातून ऋषीकेशचा खून करण्यात आला आहे काय या दृष्टीनेही पोलीस तपास करत आहेत.त्या महिलेस गुरुवारी करवीर पोलासांनी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलविले होते तर शनिवारीही त्या महिलेची चौकशी करण्यात येणार आहे.बुधवारी दिवसभर ती महिला ऋषिकेशच्या संपर्कात असल्याचे समोर आले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









