प्रतिनिधी /पणजी
लोकमान्य मल्टिपर्पज सहकारी सोसायटी, बिल्वदल-सांखळी, रवींद्र भवन सांखळी, इन्स्टिटय़ूट ऑफ मिनेझिस ब्रागांझा यांच्या संयुक्त विद्यमाने सांखळीतील रवींद्र भवनात पार पडलेल्या नाटय़ गीतगायन 2022 या स्पर्धेचे पहिले पारितोषिक रु. 25 हजार व चषक ऋषिकेश नितीन ढवळीकर याने प्राप्त केले तर द्वितीय रु. 20 हजार व चषकाचा मानकरी ठरली साक्षी स्वप्नील देसाई. तृतीय रु. 15 हजारचे पारितोषिक कु. हर्षा गणपुले यांना तर सौ. श्रृती बोरकर यांना रु. 10 हजारचे चतुर्थ पारितोषिक प्राप्त झाले. सौ. अनुष्का थळी, प्रवीण शिलकर, सौ. सिद्धी मळीक व दत्तू गावस यांना प्रत्येकी रु. 5 हजारची विशेष पारितोषिके प्राप्त झाली. दत्तगुरु केळकर, आशिष नाईक, सिद्धी पार्सेकर, श्रवण मणेरिकर व सदानंद झो यांना प्रत्येकी रु. 2 हजारची उत्तेजनार्थ पारितोषिके व चषक प्राप्त झाले.









