वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा स्टार यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत यावर्षी होणाऱया आयपीएल स्पर्धेसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही, असे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी सांगितले.
गेल्या महिन्यात झालेल्या भीषण कार अपघातात पंतला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर आता मुंबईत उपचार करण्यात येत आहेत. अपघातानंतर त्याची कार जळून भस्मसात झाली होती. त्याआधी एका बस ड्रायव्हर व कंडक्टरने पंतला गाडीतून बाहेर काढल्यामुळे तो बचावला. ‘पंत आयपीएलसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही,’ असे गांगुली यांनी सांगितले. गांगुली सध्या दिल्ली कॅपिटल्सचे संघाचे क्रिकेट संचालक असून या संघाचे नेतृत्व पंतकडेच सोपविण्यात आले होते. पण तो आता उपलब्ध होणार नसल्याने संघावर त्याचा परिणाम होऊ शकतो, असे गांगुली म्हणाले. फेबुवारीत ऑस्ट्रेलियन संघ भारत दौऱयावर येणार असून त्या मालिकेतही पंत खेळू शकणार नाही.









