हलात्री पुलावर पाणी आल्याने वातुकीसाठी रस्ता बंद : वाहनधारकांचे हाल
खानापूर : खानापूर तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून पावसाने बऱ्यापैकी विश्रांती घेतली होती. सोमवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरुच होती. मात्र रात्री पावसाने जोर केल्याने रात्रभर जोराचा पाऊस झाल्याने तालुक्यातील सर्वच नदी, नाल्यांच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हलात्री नदीच्या मणतुर्गाजवळील पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने खानापूर, हेम्माडगा रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. गेल्या आठ-दहा दिवसापासून पावसाने बऱ्यापैकी विश्रांती घेतली होती. सोमवारी हवामानात बदल झाला असून दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. रात्री 8 नंतर सुरू झालेला पाऊस पहाटेपर्यंत सुरू होता.
त्यामुळे सर्वच नदी, नाल्यांच्या पातळीत पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या महिन्याभरात दोनवेळा पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. यावर्षी पाऊस गेल्या दोन महिन्यापासून सतत सुरू असल्याने नदी, नाल्यांची पाणी पातळी स्थिर होती. तसेच शेती शिवारातही मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिल्याने शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. मात्र गेल्या आठ-दहा दिवसांपासून पावसाने बऱ्यापैकी उसंत घेतली होती. सलग दोन-तीन दिवस ऊनही पडले होते. त्यामुळे हवामानात बदल झाला होता. रविवारी रात्रीपासून हवामानात बदल झाला असून रविवारपासून पावसाची रिपरिप सुरू झाली होती. सोमवारी पावसाने जोर केल्याने मंगळवारी सकाळी नदी, नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
मणतुर्गा-असोगामार्गे खानापूर
खानापूर-हेम्माडगा रस्त्यावरील मणतुर्गाजवळील हलात्री नदीवरील पुलावर मोठ्याप्रमाणात पाणी आल्याने या रस्त्यावरील वाहतूक पोलिसांनी बंद केली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना मणतुर्गा, असोग्यावरुन खानापूर गाठावे लागत आहे. होत असलेल्या पावसामुळे तालुक्यातील नदी, नाल्यांच्या पातळीत पुन्हा मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे.









