वृत्तसंस्था/पल्लीकेली
भारतीय संघातील फलंदाज रिंकू सिंग याने नुकत्याच झालेल्य 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेत सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार मिळविला. सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील आणि गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखालील भारतीय संघाने लंकेच्या दौऱ्यात दमदार सलामी दिली असून त्यांनी टी-20 मालिका एकतर्फी जिंकली आहे. आता उभय संघातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला 2 ऑगस्टपासून प्रारंभ होत आहे. टी-20 मालिकेतील मंगळवारच्या शेवटच्या सामन्यात रिंकू सिंगने काही अप्रतिम झेल टिपल्याने भारताला हा सामना जिंकता आला. सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाच्या शर्यतीमध्ये रवी बिस्नॉई, रिंकू सिंग व रियान पराग यांचा समावेश होता. मात्र सहाय्यक प्रशिक्षक डुश्चेटी यांनी या पुरस्कारासाठी रिंकू सिंगची निवड केली.









