घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गुजरातला केकेआरविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात केकेआरचा रिंकू सिंग शेवटच्या षटकात सर्वाधिक षटकार मारून संघाला विजय मिळवून देणारा खेळाडू ठरला आहे.
प्रारंभी, गुजरातने 20 षटकांत 4 बाद 204 धावा केल्या. प्रत्युतरादाखल खेळताना रिंकू सिंग याने याने जबरदस्त खेळी साकाराताना 21 चेंडूत नाबाद 48 धावा फटकावल्या. विशेष म्हणजे, शेवटच्या षटकात सर्वाधिक षटकार मारून संघाला विजय मिळवून देणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रिंकू पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. यापूर्वी आयपीएलमध्ये एकाही खेळाडूने शेवटच्या षटकात पाच षटकार मारून सामना जिंकला नव्हता. यापूर्वी आयपीएल 2022 मध्ये डेविड मिलर आणि राशिद खान यांनी शेवटच्या षटकात तीन-तीन षटकार मारत संघाला सामना जिंकून दिला होता. याशिवाय, 2020 मध्ये अक्षर पटेलने तीन षटकार मारून विजय मिळवला होता. तसेच एमएस धोनी याने 2016 साली शेवटच्या षटकात तीन षटकार ठोकत सीएसकेला विजय मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली होती.
शेवटच्या षटकात सर्वाधिक षटकार मारून विजय मिळवणारे खेळाडू
5 षटकार- रिंकू सिंग वि. गुजरात टायटन्स, 2023
3 षटकार- डेव्हिड मिलर वि. राजस्थान, 2022
3 षटकार- रशिद खान वि. सनरायजर्स हैदराबाद, 2022
3 षटकार- अक्षर पटेल विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, 2020
3 षटकार- एमएस धोनी विरुद्ध पंजाब किंग्ज, 2016.









