तासगाव प्रतिनिधी
तालुक्यातील एका महिलेसोबत अश्लील कृत्य करत विनयभंग तसेच, तिचे पती व सासू सोडवण्यासाठी आले असता त्यांना देखील मारहाण केल्याप्रकारणी त्या गावातील जवाहर विठ्ठल हजारे यांच्यावर तासगाव पोलीसात गुन्हा दाखल होता. याप्रकरणी हजारे यांना 1 वर्षाचा सश्रम कारावास व 3 हजार रूपये दंड अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली.
महिलेचा विनयभंग व मारहाण प्रकरणी 2018 साली जवाहर विठ्ठल हजारे यांच्या विरूद्ध तासगाव पोलीस ठाण्यात भादवि कलम 354, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयीन प्रक्रियेत गुन्हा सिद्ध होताच जवाहर विठ्ठल हजारे यांना 1 वर्ष सश्रम कारावास व 3 हजार रूपये दंड अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली. सरकारतर्फे सरकारी वकील श्रीमती कल्पना फोंडके यांनी काम पा†हले व पो.कॉ.जाधव यांनी मदत केली. याचा तपास तत्कालीन पो.हे. कॉ. हणमंत बोराडे यांनी केला.