मालवण स .का .पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाची विद्यार्थिनी
मालवण । प्रतिनिधी
स .का .पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात जिमखाना विभागाअंतर्गत स्पोर्ट्स मध्ये सहभागी असलेली आणि एफ. वाय. बी .कॉम. या वर्गात शिकत असलेल्या कु. रिद्धी नितीन हडकर हिची चंद्रपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय अश्वमेध कबड्डी स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे. ही स्पर्धा दिनांक 16 ते 24 फेब्रुवारी 2025 रोजी चंद्रपूर येथे होणार आहे.रिद्धीच्या या निवडीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.ए.ठाकूर , जिमखाना प्रमुख डॉ. हंबीरराव चौगले, कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर,सचिव श्री गणेश कुशे ,सीडीसी अध्यक्ष समीर गवाणकर , शालेय समिती अध्यक्ष साईनाथ चव्हाण , संचालक संदेश कोयंडे ,भाऊ सामंत , विजय केनवडेकर , डॉ. झाटीये , महादेव पाटकर , संस्थेचे सर्व इतर पदाधिकारी सीडीसी सर्व सदस्य ,संस्थेचे सर्व सदस्य,महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,प्रशिक्षक व तिचे पालक श्री.नितीन हडकर, प्रशिक्षक श्री.हरिश्चंद्र साळुंखे, शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी यांच्यातर्फे तिचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.तसेच तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत आपल्या महाविद्यालयाने प्रथम क्रमांक प्राप्त केला त्यामध्ये रिद्धी हिचा सिंहाचा वाटा होता. तिचे वडील नितीन हडकर व कबड्डी मार्गदर्शक प्रशिक्षक हरिश्चंद्र साळुंखे सर या दोघांचे तिला मार्गदर्शन लाभले .
नितीन हडकर आणि साळुंखे सर या दोघांनी तिला कबड्डीला आवश्यक असणारे डावपेच व्यवस्थित रित्या देऊन राष्ट्रीय स्तरावर नेऊन पोचवण्याचे काम केलेले आहे. अशा प्रकारचे प्रशिक्षक आमच्या मालवण मध्ये उपलब्ध आहेत आणि ते कोणत्याही मानधनाची अपेक्षा न करता कॉलेजला विद्यार्थी घडवण्यासाठी धडपडत असतात फक्त कॉलेजचे नाही तर मालवण मध्ये अनेक विद्यार्थ्यांना ते प्रशिक्षण देत आहेत आणि मालवणचे विद्यार्थी राज्यस्तरावर आणि देशपातळीवर कसे जातील याकडे जाणीवपूर्वक लक्ष देत आहेत. आज त्यांच्या कष्टाची फळ म्हणजे राष्ट्रीय पातळीवर रिद्धी हिची झालेली निवड होय. खरोखरच मालवण साठी , कृ सी देसाई शिक्षण संस्थेसाठी , आणि सुंदर कॉलेज साठी अभिमानास्पद बाब आहे. स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयामध्ये अलीकडच्या काही वर्षात दैदीप्यमान कामगिरी सर्व विभागाकडून केली जात आहे. सिंधुदुर्ग कॉलेज हे नेहमी आघाडीवर राहण्याचा प्रयत्न करीत आहे. विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच एन सी सी, एन एस सी एस ,स्पोर्ट्स आजीवन अध्ययन , कल्चरल अशा अनेक ऍक्टिव्हिटी मध्ये सहभागी करून त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम केले जात आहे. आमचे कॉलेज नेहमीच अग्रेसर ठेवण्याचा प्रयत्न आम्ही सर्व प्राध्यापक आणि आमचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर यांनी निर्धार केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये युनिव्हर्सिटी स्तरावर राज्यस्तरावर आणि देश स्तरावर त्याच्याही पुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर आमच्या कॉलेजचे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात कशाप्रकारे जातील याकडे आम्ही जास्तीत जास्त कटाक्षाने लक्ष देणार आहोत. त्याचबरोबर आमच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना देशभरात नोकरीच्या संधी कशा प्राप्त करून देता येतील त्याचबरोबर उद्योगव्यवसायाचे ज्ञान देऊन उद्योजक कसे बनवता येईल यासाठीही आम्ही प्रयत्न करीत आहोत .आमच्या कॉलेजचे विद्यार्थी देशात आणि देशाबाहेर वेगवेगळ्या स्तरावर काम केले पाहिजे आणि कृ सी देसाई शिक्षण मंडळ मालवण , सिंधुदुर्ग कॉलेजचे नाव देशपातळीवर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जाईल, मालवण चा झेंडा संपूर्ण देशभरामध्ये कसा लागेल यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. अशा प्रकारचे वक्तव्य एनसीसी विभाग प्रमुख असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्राध्यापक डॉ. मल्लेश खोत सर यांनी केले. त्यांच्याकडून अशी माहिती सांगण्यात आली .त्यामुळे मालवण तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सिंधुदुर्ग कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा आणि आपल्या जीवनामध्ये दिशा निर्माण करावी अशा प्रकारचे आवाहन व्यावसायिक अर्थशास्त्र विभाग प्रमुख आणि राष्ट्रीय छात्र सेना विभाग प्रमुख लेफ्टनंट प्राध्यापक डॉ मल्लेश खोत यांनी केलेले आहे.









