चार शाळकरी मुले किरकोळ जखमी
बेळगाव : दुभाजकावर आदळून शाळकरी मुलांना घेऊन जाणारी रिक्षा उलटली. शुक्रवारी दुपारी नेहरुनगर परिसरात घडलेल्या अपघातात चार मुले किरकोळ जखमी झाली आहेत. या ऑटोरिक्षात दहाहून अधिक शाळकरी मुले कोंबण्यात आली होती. नेहरुनगरहून आंबेडकरनगरकडे जाताना ही घटना घडली. अपघातात रिक्षाची काच फुटली. सुदैवाने मुले किरकोळ जखमी झाली. या घटनेनंतर एपीएमसी रोडवर तब्बल 20 मिनिटे वाहतूक कोंडी झाली होती. स्थानिक नागरिकांनी रिक्षाचालकाला चोप दिल्याचीही घटना घडली.









