बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावमध्ये ऑटोरिक्षांना मीटरसक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे रिक्षाचालकांचे धाबे दणाणले असून रिक्षांना मीटर बसविण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. मीटर बसविण्यासाठी दुकानांमध्ये गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बुधवारी रस्ता सुरक्षा सप्ताहनिमित्त आयोजित बैठकीत ऑटोरिक्षांना मीटर बसविण्याबाबत सक्ती केली होती. बेळगावमध्ये अनेक रिक्षा मीटरविना फिरत असल्याचे दिसून आले होते. यामुळे प्रवाशांची फसवणूक होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी मीटरसक्तीचा इशारा दिला आहे.
मीटरसक्ती होणार हे निश्चित झाल्याने मीटर बसविण्यासाठी रिक्षाचालकांची धावपळ सुरू आहे. जुने मीटर दुऊस्त करण्यासोबतच नवीन मीटर खरेदी करण्यासाठीही गर्दी होऊ लागली आहे.









