दोघांची चौकशी : जांबिया सापडल्याने खळबळ
बेळगाव : आरटीओ सर्कलजवळ सोमवारी सायंकाळी एका रिक्षाचालकाला मारहाण करण्यात आली आहे. घटनास्थळावर जांबिया आढळून आला आहे. 20 ते 25 जणांच्या एका गटाने हे कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला असून रात्री उशिरापर्यंत एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. वासीम बेपारी (वय 42) राहणार शिवाजीनगर असे जखमी रिक्षाचालकाचे नाव असून त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. मार्केट पोलिसांनी यासंबंधी दोघा जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर याप्रकरणी तपास करीत आहेत. महिलेला मेसेज पाठविल्यावरून झालेल्या वादावादीनंतर आरटीओ सर्कलजवळील एका हॉटेलमध्ये चहा पिताना वासीमला मारहाण करण्यात आली आहे.









