वृत्तसंस्था/ दुबई,
आशिया चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी एसीसीने सामनाधिकारी व पंचांची यादी जाहीर केली आहे. आज मंगळवारपासून या स्पर्धेला सुरुवात होत आहे. साखळी टप्प्यासाठी पंच म्हणून भारताचे वीरेंदर शर्मा, रोहन पंडित, लंकेचे रवींद्र विमलासिरी, रुचिरा पल्लियागुरुगे यांची निवड केली आहे. याशिवाय अफगाणचे अहमद पक्तीन, इझातुल्लाह सफी, पाकचे असिफ याकूब, फैसल आफ्रिदी, बांगलादेशचे गाझी सोहेल व मसुदुर रेहमान हेही प्राथमिक टप्प्यात पंचांचे काम पाहतील. भारत-पाकिस्तान या हाय प्रोफाईल लढतीसाठी पायक्रॉफ्ट हे सामनाधिकारी म्हणून काम पाहतील. ही लढत 14 सप्टेंबरला दुबईत होणार आहे. पल्लियागुरुगे व रेहमान हे या सामन्यात मैदानी पंचांचे काम पाहणार आहेत.









