वृत्तसंस्था/ पर्थ
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जाय रिचर्डसन भारताविरुद्ध होणाऱया आगामी तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत उपलब्ध होऊ शकणार नाही. स्नायू दुखापतीमुळे त्याला ही आगामी मालिका हुकणार असल्याची माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने दिली आहे. आता त्याच्या जागी ऑस्ट्रेलियन संघात नाथन इलिसचा समावेश करण्यात आला आहे.
2023 च्या आयपीएल स्पर्धेसाठी जाय रिचर्डसन मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणार होता. दरम्यान, या स्पर्धेत त्याच्या सहभागाविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. गेल्या जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीग टी-20 स्पर्धेत खेळताना रिचर्डसनला ही स्नायू दुखापत झाली होती. ही दुखापत अद्याप पूर्णपणे बरी झालेली नाही. 2019 साली रिचर्डसनला खांदा दुखापतीची समस्या वारंवार जाणवल्याने त्याला तब्बल दोन वर्षे क्रिकेटपासून अलिप्त रहावे लागले होते.









