वार्ताहर /उचगाव
उचगावची कन्या ऋचा मोहनराव पावशे हिने नीट-युजी परीक्षेत देशात चौथा तर कर्नाटक राज्यात दुसरा क्रमांक मिळवून अभिमानास्पद यश मिळविले आहे. या तिच्या यशाबद्दल लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी उचगाव शाखेचे मॅनेजर सुहास नाडगौडा यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी ते म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थीवर्गाला अभ्यासाच्यादृष्टीने बऱयाचशा सोयी उपलब्ध नसतानादेखील ऋचाने हे यश मिळविलेले आहे. याबद्दल त्यांनी तिचे अभिनंदन केले. याप्रसंगी ऋचाचे वडील डॉ. मोहन पावशे, आई डॉ. स्मिता पावशे, उचगाव ग्राम पंचायतचे माजी सदस्य अनंत देसाई, सागर कांबळे आणि पराशी फर्नांडिस आदी उपस्थित होते.









