सावंतवाडी : प्रतिनिधी
अष्टपैलू संस्कृती कला अकादमी, मुंबई यांचे अष्टपैलू साहित्य भूषण गौरव पुरस्कार यंदा सौ. ऋचा हनुमंत महाबळ यांना मिळाला असे संस्थेचे आदरणीय श्री. शिवाजी किसन खैरे, संस्थापक यांनी सांगितले.या संस्थेच्या वतीने “अक्षरमंच काव्यसमूहात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत सलग तीन वर्षे सहभाग घेऊन सर्वोकृष्ट कविता सादर केल्या बद्दल या साहित्य कलेच्या सन्मानार्थ “अष्टपैलू साहित्यभूषण राज्यस्तरीय गौरव पुरस्कार सन्मान पूर्वक प्रदान करण्यात येत आहे. त्यांच्या ह्या साहित्य सेवेचे सर्वत्र कौतुक होत आहे.









