वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीच्या महिलांच्या टी-20 फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत भारताची यष्टीरक्षक आणि फलंदाज रिचा घोषने 21 व्या स्थानावर झेप घेतली आहे. रिचाचे स्थान 22 अंकांनी वधारले आहे.
नुकत्याच झालेल्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रिचा घोषने 130.76 स्ट्राईक रेटने 136 धावा जमविल्या. तसेच या स्पर्धेत रिचा घोषची आयसीसीतर्फे सर्वोत्तम महत्त्वाची खेळाडू म्हणून निवड करण्यात आली होती. लंकेची फलंदाज विस्मी गुणरत्नेने या मानांकन यादीत 95 व्या स्थानावर झेप घेतली आहे. 17 वर्षीय गुणरत्नेने आतापर्यंत केवळ 9 टी-20 सामन्यात लंकेचे प्रतिनिधित्व केले आहे. टी-20 महिलांच्या गोलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाच्या डार्सी ब्राऊनने तिसऱया स्थानावर झेप घेतली आहे.









