तालुक्यात प्रतिवर्षी एकूण 35 हजार हेक्टर क्षेत्रात भात लागवड

वार्ताहर /नंदगड
एकीकडे दिवसेंदिवस ढगाळ वातावरण, तुरळक पाऊस तर प्रतिवर्षाप्रमाणे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणारी भातपेरणी या सर्वांचा विचार करून खानापूर तालुक्मयातील ग्रामीण भागात शेतकरी भातपेरणीच्या कामात गुंतला आहे. खानापूर तालुक्मयातील नंदगड, हलशी, नागरगाळी, लोंढा, कापोली, गुंजी, रामगुरवाडी, गर्लगुंजी, पारिश्वाड, इटगी, गंदिगवाड, बरगाव, चापगाव, बेकवाड, कक्केरी, लिंगनमठ, बिडी, गोधोळी, निलावडे, शिरोली आदी भागातील शेतकरी प्रामुख्याने भातपेरणी करतात. तर जांबोटी, कणकुंबी, भागातील शेतकरी रोपलागवड करतात. खानापूर तालुक्मयात प्रतिवषी 35 हजार हेक्टर जमिनीत भाताची लागवड करण्यात येते. त्यामध्ये साधारण तीस हजार हेक्टर जमिनीत भाताची पेरणी तर उर्वरित जमिनीत रोपलागवड केली जाते. तालुक्मयातील पाणथळ जमिनीत साधारणत: पहिल्या टप्प्यात पेरणी केली जाते. भातपेरणी सध्या सुरू आहे. गेल्या दोन दिवसात खानापूर तालुक्मयाच्या काही भागात पाऊस झाला. परंतु पावसाची वाट न बघता धूळवाफ पेरणी सुरू केली आहे. अभिलाषा, दोडगा, आयआरसीटी फोर व इंद्रायणी या भाताला विशेष मागणी असल्याने शेतकरी या भाताची पेरणी करीत आहेत.
ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी
भाताची पेरणी कुरीने करण्यासाठी यापूर्वी बैलांचे सहाय्य घेतले जात होते. आजही निम्म्याहून अधिक पेरणी बैलजोडीच्या सहाय्यानेच केली जाते. तर बदलत्या काळानुसार आता ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी केली जात आहे. ट्रॅक्टरचा पेरणीसाठी उपयोग होत असल्याने ग्रामीण भागातील लोक पेरणीसाठी शेतवडीत दिसत आहेत.









