वार्ताहर/मजगाव
मजगाव परिसरातील भातपिकाची कापणी करून ठेवलेल्या भातावर पाणी साचल्याने भात कुजण्याच्या मार्गावर आहे.
बुधवार व गुरुवारी सदर परिसरात जोरदार पाऊस झाल्याने सुकलेल्या शेतामध्ये पाणी साचले आहे. सदर बासमती भाताचीच कापणी झाली असून सलग दोन दिवस जोरदार पाऊस झाल्याने शेतामध्ये पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.









