वार्ताहर/कडोली
कडोली परिसरात भातकापणीला जोर आला असून, मुजरांची टंचाई अधिक जाणवत असल्याचे चित्र दिसत असून, प्रसंगी यंत्राच्या साहाय्याने भातकापणीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. गेल्या पंधरा दिवसापासून भातकापणीची सुगी काही ठिकाणी आली होती. पण, पाऊस कमी होत नसल्याने भातकापणी झाली नाही. सध्या पावसाने उगडीप दिल्याने कडोली परिसरातील सर्व शिवारातील भातकापणी एकदम आली आहे. त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांनी भातकापणी हाती घेतल्याने मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. जो तो मजूर मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. पण मजूर मिळेनासे झाले आहेत. परिणामी बहुतांशी ठिकाणी यंत्राच्या साहाय्याने भातकापणी होत असल्याचे दिसत आहे. काही शिवारात जमिनीत ओलावा जास्त असल्याने त्या शिवारात मळणीची कामे उशीरा होण्याची शक्यता आहे.









