रत्नागिरी,प्रतिनिधी
पावसात कोकणातील प्रमुख पीक म्हणजे भात शेती.मात्र ही भाशेती पाऊस नसल्याने करपू लागली आहे.पावसाविना भातशेती कोमेजली असून,पिकांची उंची देखील खुंटली आहे.हिरवीगार शेती आता पिवळसर आणि करपून गेल्यावर शेतकरी चिंतातुर झाले आहेत. वातावरणातील बदल झाल्याने पावसाअभावी शेती खाली पडली आहे.
जून महिना पावसाअभावी कोरडा गेला,शेती उशिराने सुरू झाली.तरीही शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने भातशेती केली.पावसाअभावी भातशेती कोमेजून,काही ठिकाणी तर कातळ आणि भरडी रोपे सुकून येतात.भाताची वाढ खुंटली तर भात शेती पिवळसर आहे.मुळात भात शेती फुलोऱ्यावर असताना पीक कोमेजून गेल्याने शेतकरी भाताचं उत्पन्न प्राप्त करू शकत नाही याची देखील खात्री पटली आहे.