वार्ताहर/काकती
होनगा, कडोली सीमेवरील शिवारातील संपर्क रस्त्यावर बांधण्यात आलेल्या मोरी (सीडी)वर उच्च पाण्याच्या प्रवाहाने भगदाड पडून रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे येथील झाड भात पिकात पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. होनगा व कडोली ग्राम पंचायतीने प्रत्यक्ष पाहणी करून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. याची दखल घेवून मोरीचे बांधकाम करण्यासह रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. पाच वर्षांपूर्वी रस्ता डांबरीकरण केले. त्यावर्षीच पावसाच्या प्रवाहाने रस्ता सुनील बाबू मायाण्णाचे कडोली या सीमेकडील रस्ता भगदाड पडून रस्ता मार्गक्रमणासाठी बंद झाला तर कडोली सीमेकडील शेतकऱ्यांचे या पाण्याच्या प्रवाहाने मोठ्या प्रमाणात दरवर्षी नुकसान होत आहे. तरी या रस्त्यावर मातीचा भराव टाकून रस्ता करावा. तसेच सर्व्हे क्रमांक 82/5 भैरु काकतकर यांच्या शेतात पडलेले झाड काढून मोरीची भिंत बांधावी. त्यामुळे पूर्वीप्रमाणे पुढील कालव्याची खोदाई करून पावसाचे पाणी निचरा होण्यास मदत होईल. होनगा-कडोली पंचायतीने रोजगार हमी योजनेतून तातडीने काम हाती घ्यावे, अशी मागणी कडोलीचे यल्लाप्पा मायाण्णाचे, बाळू मुरकुटे, प्रकाश मायाण्णाचे, गिरीधर पाटील, होनग्याचे वामन आनंदाचे, महादेव आनंदाचे, अर्जुन व्हनमणी व देवगिरीचे कल्लाप्पा पाटीलसह या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.









