दीर्घकाळानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार
बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती मागील काही काळापासून स्वतःच्या आयुष्यावरून चर्चेत आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रियाला दीर्घकाळापसून सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. रिया आता लवकरच ‘एमटीव्ही रोडीज’च्या नव्या सीझनमध्ये दिसून येणार आहे. निर्मात्यांनी या शो चा प्रोमो प्रदर्शित केला आहे.

‘एमटीव्ही रोडीज’चा नवा सीझन लवकरच सुरू होणार आहे. आता या नव्या प्रोमोद्वारे सोनू सूदने या शोचा आगामी सीझन अधिकच अडचणींनी भरलेला असणार आहे. या शोमध्ये रिया नवी गँग लीडरच्या स्वरुपात दिसून येणार आहे. ‘एमटीव्ही रोडीज’ शो सर्वात अधिक तरुणाईमध्ये लोकप्रिय आहे. रियाचा या शोमधील प्रवेश सर्वांनाच चकित करणारा ठरला आहे.
या शोमध्ये प्रत्येक स्पर्धकाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. ग्रूप इंटरह्यूपासून पर्सनल इंटरव्हय़ू राउंडपर्यंत एक रोडी होण्यास आणि मग विजेता होण्यास मोठा कालावधी जातो. मागील सीझनमध्ये रणविजय दिसून आला नव्हता. अशा स्थितीत निर्मात्यांनी त्याच्या जागी सोनू सूदला नवा गँग लीडर नियुक्त केले होते. या नव्या सीजनमध्ये रियासोबत सोनू सूदही दिसून येणार आहे. याचबरोबर गौतम गुलाटी देखील गँग लीडरच्या स्वरुपात दिसून येईल.









