‘अमृत भारत’ योजनेंतर्गत देशातील 1,309 स्थानकांचा कायापालट होणार : पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय रेल्वे आता आधुनिकीकरणाकडे वाटचाल करत आहे. भारतातील सुमारे 1,309 प्रमुख रेल्वेस्थानके आता अमृत भारत रेल्वेस्थानके म्हणून विकसित केली जातील आणि त्यांचा आधुनिकतेसह पुनर्विकास केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अमृत भारत स्टेशन योजनेचा शुभारंभ केला. त्यानुसार सुमारे 25 हजार कोटी ऊपये खर्चून देशभरातील 508 रेल्वेस्थानकांना नवसंजीवनी दिली जाणार आहे.
भारतीय रेल्वेच्या इतिहासातही एक नवा अध्याय सुरू होत आहे. भारत सरकार अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 508 रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली. ही स्थानके सर्व 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेली असून त्यात कर्नाटकातील 13 तर महाराष्ट्रातील 44 स्थानकांचा समावेश आहे. या योजनेसाठी एकूण बजेट 24 हजार 470 कोटी ऊपये आहे. या योजनेंतर्गत देशातील सुमारे 1309 स्थानके मल्टी-मॉडेल हब अंतर्गत विकसित केली जाणार आहेत. भारताच्या पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
योजनेच्या पहिल्या टप्प्यांतर्गत, देशातील 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 508 रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण केले जाईल. पहिल्या टप्प्यात उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील 55-55 रेल्वे स्टेशन विकसित केले जातील. याशिवाय बिहारमध्ये 49, महाराष्ट्रात 44, पश्चिम बंगालमध्ये 37, मध्यप्रदेशमध्ये 34, आसाममध्ये 32, ओडिशामध्ये 25, पंजाबमध्ये 22, गुजरात आणि तेलंगणामध्ये प्रत्येकी 21, झारखंडमध्ये 20, आंध्रप्रदेशमध्ये 18 आणि तामिळनाडू 18, हरियाणातील 15 आणि कर्नाटकातील 13 रेल्वेस्थानकांचे आधुनिकीकरण केले जाईल.
रेल्वेस्थानकांना नवे रुप देताना स्थानकांची रचना, स्थानिक संस्कृती आणि वारसा जोपासण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच स्थानकांमध्ये दिव्यांगांच्या सुविधांसाठीही विशेष काळजी घेतली जाणार आहे. याचबरोबर जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. यामध्ये मल्टीलेव्हल पार्किंग, स्वतंत्र प्रवेश आणि बाहेर पडण्याचे दरवाजे, एक्झिक्मयुटिव्ह लॉज, सीसीटीव्ही पॅमेरे, लिफ्ट, एस्केलेटर, मोफत वाय-फाय, शॉपिंग कॉम्प्लेक्स, फूड कोर्ट, गेमिंग झोन यासारख्या सुविधा उपलब्ध असतील.
या योजनेंतर्गत दीर्घकालीन दृष्टीकोनातून रेल्वेस्थानकांचा सातत्याने विकास केला जाईल. ही योजना टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे. ज्यामध्ये परिभ्रमण क्षेत्र, वेटिंग हॉल, स्वच्छतागृह, स्वच्छता, किऑस्क या सुविधा प्रवाशांना उपलब्ध असतील. तसेच स्थानकांमध्ये प्रवाशांना आधुनिक सुविधा, उत्तम वाहतूक संचलन आणि आंतर-मॉडल एकत्रिकरण यासारख्या सुविधा पुरविण्यावरही सरकारचा भर राहील.
विकसित राष्ट्र बनविण्याचा उद्देश : पंतप्रधान
योजनेचे उद्घाटन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, या अमृत कालच्या सुऊवातीला भारत विकसित राष्ट्र बनण्याच्या उद्देशाने पुढे जात आहे. नवी ऊर्जा, नवी प्रेरणा आणि नव्या निर्धाराने भारतीय रेल्वेच्या इतिहासात एका नव्या अध्यायाची सुऊवात झाली असल्याचे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले. भारतीय रेल्वे आधुनिक करण्याबरोबरच पर्यावरणपूरक बनवण्यावर भर देण्याचा फायदा देशातील सर्व राज्यांना होणार असल्याचे ते म्हणाले. जगातील दक्षिण आफ्रिका, युव्रेन, पोलंड, ब्रिटन आणि स्वीडन सारख्या देशांपेक्षा गेल्या 9 वर्षात आपल्या देशात जास्त रेल्वे ऊळ टाकण्यात आले आहेत. दक्षिण कोरिया, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांपेक्षा गेल्या वर्षभरात भारतात जास्त रेल्वे ट्रॅक बांधण्यात आले आहेत, असेही पंतप्रधान म्हणाले. भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाची प्रक्रिया गेल्या नऊ वर्षांपासून सुरू आहे. त्याअंतर्गत पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि प्रवासी सुविधा सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महत्त्वाकांक्षी योजनेमध्ये रेल्वे स्थानकांचे नूतनीकरण, नवीन रेल्वे लाईन टाकणे, 100 टक्के विद्युतीकरण आणि प्रवासी आणि मालमत्तेची सुरक्षा वाढवणे यासारख्या विस्तृत उपक्रमांचा समावेश असल्याचेही त्यांनी नमूद केले.
विरोधक अजून जुन्याच मार्गावर
आजही विरोधकांचा एक गट जुन्याच मार्गावरून चालत आहे. आजही स्वत: काही करायचं नाही आणि दुसऱ्यालाही करू द्यायचं नाही, अशीच त्यांची मानसिकता आहे. सरकारने संसदेची नवीन इमारत बांधली, कर्तव्यमार्ग विकसित केला, पण विरोधकांनीही त्याला विरोध केला. आम्ही बांधलेल्या युद्धस्मारकाला विरोधकांनी विरोध केला. त्यांचा (विरोधकांचा) एकही नेता स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे गेला नाही, अशी वेगवेगळी उदाहरणे देत पंतप्रधानांनी विरोधकांवर टीका करण्याची संधी सोडली नाही.
योजनेचा उद्देश…
शहर केंद्रे म्हणून रेल्वेस्थानकांचा विकास
रेल्वेस्थानकांची सुधारणा आणि पुनर्विकास
प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधांची तरतूद
उत्तम वाहतूक व्यवस्था, इंटरमॉडल इंटिग्रेशन
एकसमान आणि सहाय्यक मार्गदर्शक चिन्ह
मास्टर प्लॅनमध्ये मालमत्ता विकासावर भर
लँडस्केपिंग, स्थानिक कला, संस्कृतीचे दर्शन









