देवराष्ट्रे, वार्ताहर
उन्हाची तीव्रता वाढल्याने तसेच शेतकऱ्यांमधून पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता ताकारी योजनेचे उन्हाळी आवर्तन आज( दि. 3) सायंकाळपासून सुरू होत असल्याची माहिती ताकारी योजनेचे कार्यकारी अभियंता राजन डवरी यांनी दिली.
यंदा उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे बागायती पिके कोमेजून गेली आहेत.अनेक ठिकाणी ऊस वाळू लागले आहेत. प्रचंड वाढलेल्या उष्णतेमुळे विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे ताकारी योजनेचे आवर्तन चालू करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत होती. याबाबत योजनेचे मुख्य कार्यकारी अभियंता राजन डवरी म्हणाले, आवर्तन 15 जून पर्यंत म्हणजे ४०दिवस सुरू राहणार आहे.
आतापर्यंत साडेतीन टीमसी पाण्याचा वापर
चालु वर्षी ताकारी योजनेच्या माध्यमातून साडेतीन टीएमसी पाणी कृष्णा नदीतून उचलण्यात आले आहे. योजनेसाठी 9.34 टीएमसी पाणी राखीव आहे.एक ते दीड टीएमसी पाणी प्रत्येक आवर्तनाला उचलण्यात येते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








