विनोद सावंत, कोल्हापूर
महापालिका प्रशासनाने अखेर शहरातील मिळकतींचे रिव्हीजन (फेरतपासणी) करण्याचा निर्णय घेतला आहे. मिळकतींची माहिती फॉर्मवर घेऊन नंतर संगणकमध्ये नोंद करण्याची जुनी पद्धतीला फाटा देत अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा मनपाचा प्रयत्न आहे. यासाठीच मोबाईल अॅपने मिळकतींचे रिव्हीजन करण्याचे नियोजित आहे. एका राष्ट्रीयकृत बँकेने सीएसआर फंडातून कोल्हापूर महापालिकेस हे मोबाईल अॅप देण्यासाठी पुढे आली आहे. यानुसार 2 मे पासून प्रत्यक्षात रिव्हीजनला सुरवात होईल, असे अपेक्षित आहे.
कोल्हापूर महापालिकेची संगणकीय प्रणाली 2008 पूर्वीची असून कालबाह्या झाली आहे. नवीन ‘ई’ गर्व्हनन्स सिस्टिमचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यामध्ये कालबाह्या झालेली यंत्रणा बदलली आहे. परंतू यात घरफाळा विभागाचा समावेश नाही. कोल्हापूर महापालिकेच्या घरफाळा विभागाचे स्वतंत्र सॉफ्टवेअर असणार आहे. एका राष्ट्रीयकृत बँकेने हे सॉफ्टवेअर विकसित केले असून सीएसआर फंडातून कोल्हापूर महापालिकेला हे सॉफ्टवेअर दिले आहे. संबंधित राष्ट्रीयकृत बँकेने राज्यातील आठ महापालिकेना याच धर्तीवर घरफाळ्याचे सॉफ्टवेअर दिले आहे. ठाणे महापालिकेत सॉफ्टवेअर अॅक्टीव्ह झाले आहे. यामुळे कोल्हापूर महापालिकेचे 55 लाखांच्या खर्चात बचत झाली आहे. याचे काम सुरूही झाली आहे.
ज्या राष्ट्रीयकृत बँकेने घरफाळा विभागास स्वॉफ्टवेअर दिले आहे. त्याच बँकेने मिळकतींच्या रिव्हीजनसाठी मोबाईल अॅप विकसित केले आहे. संबंधित बँकेचे मोबाईल अॅपच्या सहाय्याने कोल्हापूर शहरातील मिळकतींचा रिव्हीजन करण्याचे नियोजित आहे. महापालिकारिव्हीजन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे मोबाईल अॅप दिले जाणार आहे. वसई&-विरार महापालिकेकडून सध्या या अॅपच्या माध्यमातून रिव्हीजन सुरू आहे. तेथे कशा प्रकारे रिव्हीजन केले जाते, याचा डेमोही मनपा अधिकाऱ्यांना दाखविला आहे.
वेळेची बचतीसोबत अचुकता
गतवेळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जागेवर जावून मिळकतींची माहिती फॉर्मवर नोंदवली होती. दिवसभरात संकलित केलेली माहिती सायंकाळी कार्यालयात येवून संगणावर अपलोड केली जात होती. यानंतर संबंधित अधिक्षक यावर अंतिम निर्णय घेवून घरफाळा लागू करण्याची प्रक्रिया केली जाते. यामध्ये कर्मचाऱ्यांचा बरचास कालावधी जातो. शहराची व्याप्ती पाहिली तर तीन वर्ष काम केले तर रिव्हीजन पूर्ण होणार नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे मोबाईल अॅपने रिव्हीजन केल्यास वेळेची बचतीसोबत अचुकताही राहणार आहे.
मिळकतीच्या छायाचित्रासह माहितीही अपलोड
प्रत्यक्ष जागेवर जावून मिळकतींची घेतलेली माहिती मोबाईल अॅपमध्ये नोंद केली जाणार आहे. मिळकतीचे छायाचित्र घेण्याचीही सोय या अॅपमध्ये आहे. या मोबाईल अॅपचे मनपा अधिकाऱ्याने डेमो बघतीला आहे. संबंधित राष्ट्रीयकृत बँकेने यामध्ये आणखीन काही सुविधा पाहिजे असल्यास तशी मागणी करण्याची सूचना मनपा अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
मोबाईल अॅपने असे होणार रिव्हीजन
मनपाचा कर्मचारी प्रत्यक्ष जागेवर जावून मिळकतीचा फोटो काढणार
वाढीव बांधकाम झाले असल्यास तशी अॅपमध्ये नोंद करणार
-जागेचे क्षेत्र, मिळकतीचे बांधकामाची माहिती, वापरकर्ता यांची नोंद करणार.
-सर्व माहिती ऑनलाईनने घरफाळा विभागात ताबडतोब जाणार.
मनुष्यबळ वाढविण्याचा निर्णय
रिव्हीजनसाठी घरफाळा विभागाने प्रथम 40 कर्मचारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. परंतू रिव्हीजनला अवधी जास्त लागणार असल्याने 120 कर्मचाऱ्यांची मागणी मनपाच्या लेबर विभागाकडे करणार आहे. 120 कर्मचाऱ्यांच्या मोबाईलमध्ये रिव्हीजनचे अॅप अपलोड केले जाणार आहे.
मोबाईल अॅपचे फायदे
-नवीन मिळकत असल्यास नोंद करणे.
-बील जनरेट करण्याची सुविधा.
-मनपाकडे नोंद असणारा सध्याचा डेटा दिसणार.
-मिळकतीचे छायाचित्र अपलोड करण्याची सुविधा.
-जाग्यावर डेटा एंट्री होणार.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









