3 जूनला होणार फायनल
वृत्तसंस्था/ मुंबई
आयपीएलमधील उर्वरित सामन्यांचे नवीन वेळापत्रक सोमवारी रात्री जाहीर करण्यात आले. आयपीएलचे सामने आता 17 मे पासून सुरु होणार आहेत आणि अंतिम सामना 3 जूनला होणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली. गत आठवड्यात भारत व पाकिस्तानमधील तणावपूर्ण वातावरणामुळे आयपीएलचे सामने तात्पुरते स्थगित करण्यात आले होते. पण, आता हा तणाव निवळल्यानंतर आयपीएलचे वेळापत्रक नव्याने जाहीर करण्यात आले आहे.
आरसीबी आणि एलएसजी यांच्यातील पहिला सामना 17 मे रोजी बेंगळूरमध्ये खेळवला जाईल. उर्वरित सामने जयपूर, दिल्ली, लखनौ, मुंबई आणि अहमदाबाद येथे खेळवले जातील. लीग स्टेज 27 मे रोजी संपेल. रविवार, 18 आणि 25 मे रोजी 2 डबल हेडर सामने खेळले जातील. म्हणजेच 11 दिवसांत 13 लीग स्टेज सामने होतील. दरम्यान, 8 मे रोजी धरमशाला येथे पंजाब आणि दिल्ली यांच्यातील सामना पाकिस्तानच्या हल्ल्यांमुळे थांबवावा लागला होता. हा सामना आता 24 मे रोजी जयपूर येथे खेळवला जाईल.
उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक
17 मे, सायंकाळी 7:30 वा : आरसीबी वि केकेआर, बंगळूर
18 मे, दुपारी 3:30 वा : राजस्थान रॉयल्स वि पंजाब, जयपूर
18 मे, सायंकाळी 7:30 वा : दिल्ली कॅपिटल्स वि गुजरात टायटन्स, दिल्ली
19 मे, सायंकाळी 7:30 वा : लखनौ वि सनरायझर्स हैदराबाद, लखनौ
20 मे, सायंकाळी 7:30: चेन्नई सुपर किंग्ज वि राजस्थान, दिल्ली
21 मे, सायंकाळी 7:30: मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, मुंबई
22 मे, संध्याकाळी 7:30 : गुजरात टायटन्स वि लखनौ, अहमदाबाद
23 मे, सायंकाळी 7:30 वाजता : आरसीबी वि सनरायझर्स हैदराबाद, बंगळूर
24 मे सायंकाळी 7:30 पंजाब किंग्ज वि दिल्ली कॅपिटल्स, जयपूर
25 मे, दुपारी 3:30: गुजरात टायटन्स वि चेन्नई सुपर किंग्ज, अहमदाबाद
25 मे, सायंकाळी 7:30 : सनरायझर्स हैदराबाद वि केकेआर, दिल्ली
26 मे, सायंकाळी 7:30 : पंजाब किंग्ज वि मुंबई इंडियन्स, जयपूर
27 मे, सायंकाळी 7:30: लखनौ सुपर जायंट्स वि आरसीबी, लखनौ
29 मे, संध्याकाळी 7:30 वा : क्वालिफायर 1
30 मे, संध्याकाळी 7:30 वा : एलिमिनेटर
01 जून, संध्याकाळी 7:30 : क्वालिफायर 2
03 जून, संध्याकाळी 7:30 वा : अंतिम सामना









