रत्नागिरी वार्ताहर
रत्नागिरी विमानतळासाठी आवश्यक असणाऱ्या मौजे तिवंडेवाडी व मौजे मिरजोळे ता. जि. रत्नागिरी येथील एकूण क्षेत्र 27.99.59 हे. आर. बी. मी संपादन करिता उपविभागीय अधिकारी रत्नागिरी यांना भूसंपादनासाठी .77.70 कोटी व टर्मिनल बिल्डींग बांधकाम रु.10.00 कोटी, विमानतळाचे परिचालन व देखभालीचा वार्षिक खर्च (आवर्ती) रु.6 कोटी व महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मर्या, मुंबईच्या कार्यालयाचा आस्थापना खर्चाकरिता येणारी रक्कम रु 3.78 कोटी असा एकूण खर्च रु.97.44 कोटी निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसा आदेश महाराष्ट्र शासनाला प्राप्त झाला आहे.
केंद्र शासनाच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात रत्नागिरी विमानतळाचा समावेश करण्यात आलेला आहे. हे विमानतळ भारतीय तटरक्षक दलाच्या ताब्यात आहे. विमानतळाची सद्यस्थितीतील धावपट्टी 1372 मी. (4500 फूट) लांबीची आहे. तथापि, प्रादेशिक जोड योजने योजनेअंतर्गत रत्नागिरी विमानतळ सैनिकी विमाने वाहतुकीसाठी व इतर अनुषंगिक सेवा पुरवण्यास सक्षम व्हावा, यादृष्टीने या धावपट्टीची लांबी वाढवून ती 2135 मी. (7000 फूट) करण्याची मागणी तटरक्षक दलाने केली होती.