प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव रेल्वेस्थानकाच्या रिमोल्डिंगचे काम सुरू असून नवीन ट्रक घालण्याचे काम युद्धपातळीवर केले जात आहे. या कामाचा आढावा हुबळी येथील विभागीय व्यवस्थापकांनी शुक्रवारी घेतला. गोगटे ओव्हरब्रिजखाली सुरू असलेल्या कामाची पाहणी करून त्यांनी रेल्वे अधिकाऱयांना सूचना केल्या. मिरज ते हुबळी या दरम्यान रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण व विद्युतीकरण केले जात आहे. हे काम व्यवस्थित पद्धतीने पार पाडावे यासाठी रेल्वे अधिकारी जातीने उपस्थित राहून आढावा घेत आहेत. हुबळी येथील विभागीय व्यवस्थापक अरविंद मालखेडे यांनी आपल्या अधिकाऱयांसमवेत यार्ड रिमोल्डिंग कामाचा आढावा घेतला. सध्या गोगटे ओव्हरब्रिजपासून तानाजी गल्ली रेल्वेगेटपर्यंत काम सुरू आहे. हे काम दर्जेदार होण्यासाठी विभागीय व्यवस्थापकांनी रेल्वेस्थानकाला भेट दिली.