पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची पाहणी
बेळगाव : शहरात सततच्या पावसामुळे रस्ते, गटारी तसेच इतर समस्या निर्माण झाल्या आहेत. या सर्वांची पाहणी करून तात्काळ विकासकामे राबविण्याच्या सूचना बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी अधिकाऱ्यांना केले आहे. त्यांनी समर्थनगर, मारुतीनगर, अमननगर या परिसराला भेटी देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या. अमननगर येथे अनेक ठिकाणी रस्ता चिखलमय झाला आहे. समर्थनगर येथे ठिकठिकाणी घरांमध्ये पाणी शिरत आहे. मारुतीनगर येथेही पाणी साचल्यामुळे रहिवाशांना त्रास सहन करावा लागला. यापुढील काळात या समस्या उद्भवू नयेत यासाठी आमदार राजू सेठ यांनी शहरातील उपनगरांचा आढावा घेतला. त्यांच्यासोबत महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटीही उपस्थित होते.









