लग्नाला विरोध केल्याने काढला होता काटा; गोळ्या झाडून केला होता खून
रत्नागिरी प्रतिनिधी
तालुक्यातील कोतवडे घारपुरेवाडी येथील तरूणाच्या खून खटल्यात शवविच्छेदन करणारे वैद्यकीय अधिकाऱ्याचा उलट तपास न्यायालयापुढे होणार आह़े. गोळ्या घालून करण्यात आलेल्या या खून पकरणात वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष अत्यंत महत्वाची असल्याचे मानले जात आह़े. सरकारी पक्षाकडून वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सरतपास घेण्यात आल्यानंतर आता उलटतपासाकडे लक्ष लागून राहिले आह़े.
भिकाजी कृष्णा कांबळे (43, ऱा मारगांबेवाडी कोतवडे) असे बंदुकीने गोळ्या घालून खून करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आह़े पोलिसांच्या तपासामध्ये ऋषीकेश विजय सनगरे (21, ऱा सनगरेवाडी, कोतवडे) यांनेच हा खून केल्याचे उघड झाले होत़े. त्यानुसार रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी ऋषीकेश याच्याविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करून न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठेवल़े. रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल़ ड़ी बीले यांच्या न्यायालयात हा खटला चालवण्यात येत आह़े. सरकारी पक्षाकडून ऍड पुष्पराज शेट्ये न्यायालयापुढे युक्तीवाद करत आहेत़.
भिकाजी रंगकाम करणारे ठेकेदार म्हणून कोतवडे गावात परिचित होत़े भिकाजी यांच्या मुलीसोबत लग्न करण्याची इच्छा ऋषीकेश याने भिकाजी यांच्याकडे व्यक्त केल़ी. मात्र या लग्नाला भिकाजी यांनी विरोध दर्शवला होत़ा. दिनांक 18 एपिल 2019 रोजी रात्री 8.30 च्या सुमारास भिकाजी कांबळे हे रस्त्याने घरी एकटे जात होत़े याचा फायदा गावठी बंदुकीतून भिकाजी त्यांच्या छातीवर गोळी झाडण्यात आल़ी. यावेळी मोठ्या पमाणावर रक्तस्त्राव झाल्याने भिकाजी कांबळे त्यांचा जागीच मृत्यू झाल़ा. गोळीच्या आवाजाने ग्रामस्थांनी याठिकाणी धाव घेतल़ी. यावेळी भिकाजी हा रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला असल्याचे दिसून आल़े.
यापकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 24 तपास खूनाचा छडा लावत ऋषीकेश सनगरे याला ताब्यात घेतल़े. पोलिसांनी तपास करून न्यायालयापुढे दोषारोपपत्र ठवले आह़े. त्यानुसार सत्र न्यायालयात हा खटला चालविण्यात येत आह़े. भिकाजी सनगरे यांच्यावर रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे शवविच्छेदन करण्यात आले होत़े. तसेच मृतदेहाचा पंचनामा देखील करण्यात आला होत़ा. शवविच्छेदन अहवालानुसार भिकाजी यांचा मृत्यू हा गोळी लागल्यामुळे झाल्याचे निष्पन्न झाल़े.
त्यानुसार वैद्यकिय अधिकाऱयांची साक्ष आता अत्यंत महत्वपूर्ण असल्याचे मानले जात आह़े भिकाजी कांबळे यांच्या शरिराच्या कोणत्या भागावर गोळी लागली होत़ी कशा पकारची जखम झाली, गोळी किती अंतरावरून मारली यासंबंधीची माहिती वैद्यकीय अधिकाऱयांनी आपल्या साक्षीमध्ये नोंदविली आह़े दरम्यान यासंबधी आता बचाव पक्षाकडून उलट तपास घेतला जाणार आह़े
खून करण्यासाठी रिव्हॉलवर मिळवले
ऋषीकेश हा मुंबई येथे कामाला होता. लग्नाला विरोध केल्याने भिकाजी यांच्याबाबत त्याच्या मनात राग धुमसत होत़ा गावी आल्यानंतर देखील भिकाजी कांबळे यांच्यासोबत त्याचे खटके उडत होत़े भिकाजी कांबळे यांना मारण्यासाठी वापरण्यात आलेले गावठी रिव्हॉलवर त्याने मिळवले होते असा आरोप ऋषीकेश याच्यावर ठेवण्यात आला आह़े.