प्रवीण देसाई,कोल्हापूर
Department of Revenue Kolhapur : महसूल विभागातील बदल्यांचा सावळा गोंधळ सुऊ असल्याचे चित्र आहे.2019 पासून महापूर,कोरोनासह विविध कारणांनी महसूल विभागातील बदल्या झालेल्या नाहीत.वेळोवेळी देण्यात आलेल्या मुदतवाढीमुळे अनेक कर्मचारी एकाच जागेवर सात ते आठ वर्षे तिष्ठत आहेत.यंदा तरी बदली होईल अशी अपेक्षा असणाऱ्या 470 बदली पात्र कर्मचाऱ्यांचा पुन्हा हिरमोड झाला आहे. त्यांना आता 30 जूनपर्यंत बदलीसाठी थांबावे लागणार आहे.लवकरात लवकर बदलीप्रक्रीया शासन व जिल्हा प्रशासनस्तरावर पूर्ण करावी,अशी मागणी कर्मचाऱ्यांमधून जोर धऊ लागली आहे.
दरवर्षी एप्रिल ते मे महिन्यात महसूल कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत असतात.यंदाही 31 मे पर्यंत बदल्या होतील अशी अपेक्षा होती.त्यानुसार बदली पात्र 74 मंडल अधिकारी, 170 अव्वल कारकून, 226 लिपिक यांच्या सेवापुस्तकानुसार याद्या तयार करण्याचे काम पूर्ण झाले होते.शासनाकडून आदेश आल्यानंतर बदल्यांचे आदेश काढण्यात येणार होते. परंतु राज्य सरकारने अचानक या बदल्यांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली.त्यामुळे बदलीपात्र कर्मचाऱ्यांचा हिरमोड झाला आहे.
एका जागेवर तीन वर्षे काम करणे व मुख्यालयात सहा वर्षे काम करणे हे बदलीसाठी कर्मचाऱ्यांना निकष आहेत.परंतु 2019 पासून महापूर, कोरोनासह विविध कारणांनी महसूल विभागातील बदल्या झालेल्या नाहीत.यामध्ये दोन वर्षांपूर्वी 10 टक्केप्रमाणे काही जणांच्या झालेल्या बदल्यांचा अपवाद आहे.वेळोवेळी देण्यात आलेल्या मुदतवाढीमुळे अनेक कर्मचारी एकाच जागेवर सात ते आठ वर्षे तिष्ठत आहेत.यंदा तरी वेळेत बदली होईल अपेक्षाही फोल ठरल्याचे दिसत आहे.बदलीसाठी पुन्हा 30 जूनपर्यंत थांबावे लागणार आहे.यावेळी पुन्हा कोणता नवीन निर्णय होतो की काय ?अशी धास्तीही अनेक कर्मचार्यांना वाटत आहे. त्यामुळे लवकरात लवकर बदली प्रक्रिया राबवावी असा सूर कर्मचार्यांमधून उमटत आहे.तसेच सांगलीसह इतर काही जिह्यात जिल्हाधिकार्यांनी आपल्यास्तरावर महसूल कर्मचार्यांची बदली प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्या धर्तीवर कोल्हापूर जिल्हाधिकार्यांनी ही प्रक्रीया राबवावी अशी मागणीही होत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौर्यानंतर बदली प्रक्रियेला येणार गती ?
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 11 जूनला कोल्हापूर दौर्यावर येत आहेत.या दौऱ्यानंतर जिल्ह्यातील महसूल कर्मचार्यांची बदली प्रक्रिया होईल,अशी चर्चा महसूल वर्तुळात सुऊ आहे. या दौर्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाची सर्व यंत्रणा कार्यरत आहे.त्यामुळे बदल्यांबाबत तातडीने निर्णय होईल,अशी शक्यता वाटत नाही.त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा झाल्यानंतरच बदल्यांना मुहूर्त लागेल,अशी शक्यता वर्तविली जात आहे.
महसूल कर्मचार्यांच्या बदल्या विविध कारणांमुळे गेल्या काही वर्षांपासून झालेल्या नाहीत.यामुळे अनेक कर्मचारी एकाच जागेवर अनेक वर्षे आहेत.एकाच ठिकाणी जास्त वर्षे काम केल्याने त्यांच्यात कामाचा उत्साह राहीलेला नाही. यासंदर्भात अनेक कर्मचाऱ्यांनी महसूल कर्मचारी संघटनेकडे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची संघटनेच्या माध्यमातून भेट घेऊन बदली प्रक्रिया लवकर पूर्ण करावी,अशी मागणी केली जाणार आहे.
-अकिल शेख, जिल्हा सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघट