कुत्रे आडवे गेल्याने नांदेड येथे दुचाकीचा अपघात,
जिल्हाधिकारी कार्यालयात होते कार्यरत
सातारा
जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सेवक या पदावर कार्यरत असलेले संतोष नलवडे (वय ५०) यांचे नांदेड येथे अपघाती निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.
नांदेड येथे राज्यस्तरीय महसूल सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पुणे विभागाकडून संतोष नलवडे यांनी भाग घेतला होता. त्यासाठी ते नांदेडला गेले होते. रविवारी रात्रीच्या वेळी मित्रासोबत ते दुचाकीवरून जेवायला जात होते. यावेळी दुचाकीला कुत्रे आडवे गेल्याने दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघात संतोष नलवडे हे गंभीर जखमी झाले. त्यांना नांदेडच्या खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर सोमवारी सकाळी साताऱ्यातील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. त्यांनी बऱ्याच मालिकांमधून त्यांनी आपले अभिनय कौशल्य दाखविले आहे. त्याच्या निधनाची बातमी कळताच कुंटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र परिवारामधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
Previous Articleकोल्हापूर विभागातील एसटीच्या २३८ फेऱ्या रद्द
Next Article दुचाकी घसरुन अपघातात एकजण ठार








