प्रतिनिधी /फोंडा
तळेखोल पारंपई मडकई येथील श्री नवदुर्गा गावशीकान्न देवीचा प्रकटोत्सव 23 व 24 मे रोजी साजरा करण्यात येणार आहे. सोमवार 23 रोजी नवमीला प्रकटोत्सवाला सुरुवात होईल. यानिमित्त सकाळी 8.30 ते दुपारी 12 वा. यावेळेत अभिषेक व इतर धार्मिक विधी, दुपारी 12.30 वा. देवीच्या प्रकटोत्सवाला प्रारंभ, मशाल प्रज्वलन, वैरागी आरती मंडळातर्फे महाआरती, त्यानंतर तीर्थप्रसाद व महाप्रसाद होईल. दुपारी 2 वा. पारंपारिक अतिथींचा सन्मान सोहळा, 3 वा. अडकोण येथील युवती भजनी मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम, सायं. 5.30 वा. भोम येथील सुरेश नाईक व साथी कलाकारांतर्फे भजनाचा कार्यक्रम होईल. रात्री 9 ते 11 वा. यावेळेत सुगम संगीताचा कार्यक्रम सादर करण्यात येईल. मंगळवार 24 रोजी सकाळी 8.30 वा. ते सायं. 5 वाजेपर्यंत प्रकटोत्सव दर्शन सोहळा व गाऱहाणे, दुपारी 3.30 वा. दिंडी वारकरी सांप्रदाय फोंडातर्फे हरिपाठ पारायण, सायं. 5 वा. प्रकटोत्सवाची सांगता होईल.









