त्वचेचं सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी आजकाल अनेक उपाय केले जातात.बाजारातही त्वचेची योग्य निगा राखण्यासाठी अनेक प्रॉडक्ट उपलब्ध असतात.पण त्वचेवरील डेड स्कीन काढण्यासाठी सध्या प्युमिक स्टोनचा वापर केला जातो. यालाच झावा दगड असंही म्हणतात.साधारणपणे पायाच्या टाचा, गुडघे, हातावरची जाड आणि काळी झालेली त्वचा स्वच्छ करण्यासाठी हा दगड वापरला जातो.आज आपण हा स्टोन कसा वापरावा तसेच याचे फायदे काय आहेत हे जाणून घेऊया.
प्युमिक स्टोन ज्वालामुखीमुळे तयार होते. तो खूपच हलका आणि सच्छिद्र असतो. या दगडाचा वापर प्रामुख्याने त्वचा स्वच्छ करण्यासाठीच केला जातो. मात्र हा दगड कुठे आणि कसा वापरावा हे माहीत असायला हवं.पाय स्वच्छ करण्यासाठी एका टबमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात तुमचे पाय बुडवून ठेवा. पाय भिजल्यावर तुम्ही प्युमिक दगडाने तुमच्या पायाच्या टाचा स्वच्छ करा.कोमट पाण्यामुळे त्वचा मऊ होते आणि स्वच्छ करण्यास मदत होते.त्वचेवर साबण अथवा तेल लावूनही तुम्ही प्युमिक दगड वापरू शकता. त्वचेवर हा दगड एक ते दोन वेळा हळूवार घासल्यास तुमच्या त्वचेवरील डेड स्कीन आणि धुळ, माती निघून जाते. प्युमिक स्टोनचा वापर झाल्यावर त्वचा आणि दगड दोन्ही स्वच्छ पाण्याने धुवावे.या स्टोनचा वापर केल्यावर मॉइस्चराइझर लावा. या स्टोनचा वापर तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा करू शकता.
जर तुमच्या पायाच्या टाचा फुटल्या असतील तर अशा वेळी तुम्ही पायांच्या टाचांवरील जाड स्कीन काढून टाकण्यासाठी प्युमिक स्टोनचा वापर करू शकता. तसेच घरी पेडिक्युअर आणि मेनिक्युअर करण्यासाठी प्युबिक स्टोन फायद्याचा आहे.अंगावरील अनावश्यक केस कमी करण्यासाठी तुम्ही नियमित प्युमिक स्टोन वापरू शकता. मान, हात, अंडरआर्म्स, मांड्या स्वच्छ करण्यासाठी तुम्ही प्युमिक स्टोन वापरू शकता. मात्र फार जोरात तो त्वचेवर रगडू नका. नाहीतर त्वचेचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी









