वृत्तसंस्था / नवी दिल्ली
इस्रायलने भारताच्या राजदूतपदी अनुभवी मुत्सद्दी रेऊवेन अझार यांची नियुक्ती केली आहे. अझार सध्या रोमानियात इस्रायलचे राजदूत आहेत. त्यांनी अमेरिकेचे उपराजदूत म्हणूनही 2014 ते 2018 या कालावधीत कार्य केले आहे. ते इस्रायलचे संयुक्त राष्ट्रसंघाचेही प्रतिनिधी होते. अझार हे आपल्या कार्यकाळात भारत आणि इस्रायल यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी कार्य करतील असा विश्वास इस्र ायलने व्यक्त केला आहे. भारतानेही अझार यांचे अभिनंदन केले असून् दोन्ही देशांच्या सहकार्याचे भवितव्य त्यांच्या हाती सुरक्षित असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अझार यांनी ईजिप्तची राजधानी कैरो येथेही इस्रायलच्या दूतावासात महत्वाचे अधिकारी म्हणून कार्य केले असून त्यांचा भारत विषयक अभ्यास मोठा असल्याने त्यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.









