कराड :
नांदगाव (ता. कराड) येथे उसाच्या शेतात सापडलेल्या बिबट्याच्या दोन पिल्लांची मादी बिबटशी पुनर्भेट झाली. त्यामुळे वनविभागाच्या परिश्रमांना यश मिळाले असून या भेटीचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. नांदगाव येथे उसाच्या शेतामध्ये बिबट्याची पिल्ले ऊस तोडताना आढळून आल्याने सदरची पिल्ले वनविभागाने ताब्यात घेतली. उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सहाय्यक संरक्षक महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल ललिता पाटील, वनपाल आनंद जगताप, वनरक्षक अभिजीत शेळके, कैलास सानप, अक्षय पाटील व वाईल्ड हार्ट रेस्क्युअर नाईट कराड या टीमचे सदस्य अजय महाडिक, गणेश काळे, रोहित कुलकर्णी, रोहित पवार व सचिन मोहिते यांनी व्यवस्थित नियोजन करून बिबट्या मादीची आणि पिलांची सुखरूप भेट घडवून आणली. वनविभाग व रेस्क्यूअर टीमने केलेल्या परिश्रमांना यश आले.








