कोल्हापूर / संग्राम काटकर :
राजारामपुरीतील शहीद भगतसिंग तरुण मंडळातील दोन गटात सात वर्षांपासून सुऊ राहिलेला किरकोळ कारणावरील वाद मिटला आहे. दोन्ही गटांनी स्वयंस्फुर्तीने वादावर पडदा टाकताना कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन घडवले. तसेच यंदापासून दोन्ही गटांनी एकत्रितपणे गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा नव्याने सुऊ करण्याचेही ठरवले आहेत. मंडळाच्या सहाव्या गल्लीतील मुळच्या जागेतच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे मंडळाने ठरवले आहे.
राजारामपुरी सहाव्या गल्लीत 1980 साली स्थापन केलेल्या शहीद भगतसिंग तऊण मंडळ सुऊवातीच्या काळात साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करत होते. या मंडळाने 2001 साली गणेशोत्सवात 21 फुटी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. त्यामुळे हे मंडळ खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आहे. यानंतर प्रत्येक वर्षीच्या गणेशोत्सवात 21 फुटी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना कऊन लाखो गणेशभक्तांची गर्दी खेचली. कोल्हापूरचा चिंतामणी असेही आपल्या 21 फुटी गणेशमूर्तीचे नामकरण केले. मंडळात सर्व काही व्यवस्थित असतानाच 2018 साली मंडळात घडू नये ते घडले आणि किरकोळ कारणावऊन वाद झाला. एरवी खांदाला खांदा लावून गणेशोत्सव करणाऱ्या याच मंडळात दोन गट पडले.
- वाद होऊनही खुन्नस टाळली…सभासद वर्गणीतून गणेशोत्सव
मंडळाच्या दोन गटातील वाद पोलीस, न्यायालयापर्यंत गेला. हे पाहून राजारामपुरीतील इतर मंडळे व रहिवाशांना मंडळात विघ्न आले कसे असा प्रश्न पडला. 2019 साली तर एका गटाने राजारामपुरीतील सहाव्या गल्लीतील दुसऱ्या जागेत 21 फुटी तर दुसऱ्या गटाने राजारामपुरीतील मुख्य रस्त्यावर 21 फुटी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली. त्यामुळे ज्या मुळच्या जागेवर दरवर्षी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होत होती, ती जागा मोकळी राहिली. शिवाय एकाच मंडळाच्या दोन गणेशमूर्तीमधून ईर्ष्याही राजारामपुरी पाहत होते. दोन्ही गटातील वाद टोकाला जाईल, या भीतीपोटी राजारामपुरीतील लोक मंडळाच्या दोन्हीही गटांमधील वादाकडे दुर्लक्ष करत होते. या सगळ्यात एक जमेची बाजू होती ती म्हणजे दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांनी दुसऱ्या गटातील कार्यकर्त्यांना खुन्नस न देण्याचा प्रकार केला नाही. शिवाय दोन्हीही गटांनी लोकांकडून वर्गणी मागण्याऐवजी सभासदांमधून वर्गणी उभा कऊन त्यातूनच गणेशोत्सव साजरा करण्याची सजगताही दाखवली. अशा पद्धतीने मागील वर्षांपर्यंत दोन्हीही गटांनी गणेशोत्सव साजरा केला.
- वाद मिटवण्याची स्वयंस्फूर्तीने उचलली पाऊले…
गेल्यावर्षी मात्र दोन्ही गटातील वादाची ठिणगी शमण्याच्या दृष्टीने पाऊले पडू लागली. 2024 चा गणेशोत्सव वेगवेगळ्या साजरा केल्यानंतर दोन्ही गट एकत्र येण्याच्या हालचाली सुऊ झाल्या. मतभेदाची दरी कमी होऊन एरवी एकमेकांना न भेटणारे दोन्ही गटातील कार्यकर्ते सतत भेटू राहिले. यातून दोन्ही गटातील मनोमिलन घडेल अशी चिन्हे तयार झाली. गेल्या महिन्यात दोन्ही गटांनी ठरवून आपल्यातील सात वर्षांपासूनचा वाद मिटवला. यंदापासून गणेशोत्सवही एकत्रित करत राजारामपुरी 6 व्या गल्लीतील मुळच्या जागेतच गणेशमूर्ती बसवण्याचे ठरवले. तसेच तातडीने मुंबईत जाऊन मूर्तीकार उदय खातू यांच्याकडे 21 फुटी गणेशमूर्तीची ऑर्डर दिली. आता गणेशोत्सवात गणरायाच्या साक्षीने भेतभेदाची जी उरली सुरली दरी असेल तीही कार्यकर्ते बजवून टाकतील यात शंका नाही.
किरकोळ कारणावरुन मंडळात झालेला वाद आता आम्ही पुर्णपणे विसऊन एकत्र आलो आहोत. सर्वजण एकत्र येऊन गणेशोत्सवासाठी वर्गणीही जमवू लागलो आहे. गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा करण्यासाठी सर्वांनी मिळून तात्पुरत्या स्वऊपाची गणेशोत्सव समिती स्थापन केली आहे. तसेच गणेशोत्सवात सामाजिक उपक्रम राबवण्याचे समिती व कार्यकर्त्यांनी एकदिलाने ठरवले आहे.
-अजित लोंढे व जयदिप रसाळ (शहीद भगतसिंग तरुण मंडळ)








