प्रतिनिधी / बेळगाव
मिलिटरी हॉस्पिटलजवळ बुधवारी सापडलेले दीड तोळ्याचे मंगळसूत्र संबंधितांना परत करण्यात आले. उचगाव येथील एका निवृत्त सैनिकाने प्रामाणिकपणा दाखविला असून त्यांचे कौतुक होत आहे.
निवृत्त कर्नल पी. जी. सुब्बापूरमठ यांच्या पत्नीचे मंगळसूत्र मिलिटरी हॉस्पिटलजवळ हरवले होते. ते उचगाव येथील निवृत्त जवान सुरेश देसाई यांना मिळाले. त्यांनी मिलिटरी हॉस्पिटलमधील कर्मचारी व अधिकाऱ्यांना ही माहिती देऊन जर कोणी विचारणा केली तर आपल्याशी संपर्क साधा, असा निरोप दिला होता.
हे मंगळसूत्र निवृत्त कर्नल पी. जी. सुब्बापूरमठ यांचे असल्याचे उघडकीस येताच कॅम्प पोलीस स्थानकात पोलीस व लष्करी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सुरेश यांचे चिरंजीव व सामाजिक कार्यकर्ते उमाशंकर सुरेश देसाई यांनी संबंधितांना परत केले. या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.









