वृत्तसंस्था /न्यूयॉर्क
28 ऑगस्टपासून येथे सुरू होणाऱ्या 2023 च्या अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेतून क्रोएशियाचा मॅरीन सिलिक तसेच कॅनडाचा डेनिस शेपोव्हॅलोव यांनी माघार घेतली आहे. सदर माहिती बुधवारी स्पर्धा आयोजकांनी दिली आहे. सिलिक आणि शेपोव्हॅलोव यांना गुडघा दुखापतीची समस्या भेडसावत असल्याने या दोघांनीही सदर स्पर्धेत आपण उपलब्ध होऊ शकणार नाही असे स्पर्धा आयोजकांना कळवले आहे. 34 वर्षीय सिलिकने न्यूयॉर्कमधील हार्डकोर्ट टेनिस स्पर्धेत गेल्या वर्षी उपांत्य फेरी गाठली. कॅनडाचा 24 वर्षीय आणि 22 वा मानांकित टेनिस शेपोव्हॅलोवने अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धेसाठी आपण उपलब्ध होऊ शकणार नाही असे स्पर्धा आयोजकांना कळवले आहे. 2019 साली शेपोव्हॅलोवने केवळ एटीपी टूरवरील एक स्पर्धा जिंकली होती. दक्षिण कोरियाच्या सून वूने गेल्या जानेवारीत एटीपी टूरवरील स्पर्धेतील दुसरे जेतेपद मिळवले होते.









