वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्पेनचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा फुटबॉलपटू जॉर्डी अल्बाने आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रातून आपली निवृत्तीची घोषणा केली असून शुक्रवारी स्पॅनीश फुटबॉल फेडरेशनने या बातमीला अधिकृत दुजोरा दिला आहे.
स्पेनचा अल्बा हा बचावफळीतील महत्त्वाचा खेळाडू म्हणून ओळखला गेला. क्लबस्तरीय फुटबॉल क्षेत्रात त्याने बार्सिलोना तसेच अमेरिकेतील इंटर मियामी क्लबचे प्रतिनिधीत्व केले आहे. अल्बाच्या शानदार कामगिरीमुळे गेल्या जूनमध्ये झालेल्या युफाच्या नेशन्स लिग फुटबॉल स्पर्धेत त्याच्या संघाने विजेतेपद मिळवले होते. 2011 साली अल्बाच्या स्पॅनीश राष्ट्रीय फुटबॉल संघाबरोबरच्या प्रवाशाला प्रारंभ झाला. त्याने 92 आंतरराष्ट्रीय सामन्यात स्पेनचे प्रतिनिधीत्व करताना 9 गोल नोंदवले. स्पॅनीश फुटबॉल फेडरेशनने अल्बाला त्याच्या भावी आयुष्यात शुभेच्छा दिल्या आहेत.









