नाहीतर ,सेवा सोडावी लागेल ; शिक्षकांचे शिक्षण संचालकांना पत्र
सावंतवाडी | प्रतिनिधी
सेवानिवृत्त जेष्ठ शिक्षक गेल्या जून पासून 20000 रुपये मानधन तत्त्वावर पुन्हा शिक्षकी सेवेत रुजू झाले आहेत. गेले पाच महिने त्यांना मानधनच देण्यात आलेले नाही. जवळपास चार लाख 77 हजार रुपये एवढे मानधन 53 शिक्षकांचे देणे आहे. याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री कुडाळकर यांनी या 53 शिक्षकांचे मानधन द्या. अशा मागणीचे स्मरणपत्र शिक्षण संचालकांना पाठवले आहे या 53 शिक्षकांनी आम्हाला आता दिवाळी अगोदर तरी मानधन द्या. नाहीतर, आम्हाला ही सेवा सोडावी लागेल. अशी विनंती तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे केली आहे. त्या अनुषंगाने प्राथमिक शिक्षण विभागाने सेवानिवृत्त शिक्षकांच्या सेवा मानधनाबाबतचे पत्र शिक्षण संचालकांना पाठवले आहे. ३ नोव्हेंबरला शिक्षण संचालक यांच्याकडे तशी मागणी केली आहे.









