अथणी तालुक्यातील खवटकोप्पचे रहिवासी निवृत्त पोस्टमन मल्लप्पा आळगौड होसपेठे (वय वर्षे ७२) यांचे गुरुवार दि. २९ जून रोजी निधन झाले. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार बैलहोंगल येथील डॉ. रामन्नवर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हुबळी येथील केएलई जगद्गुरू गंगाधर महास्वामी मुरुसावीरमठ येथील वैद्यकीय विद्यार्थ्यांना शरीर रचना अभ्यास करण्यासाठी दिवंगत मल्लप्पा आळगौड होसपेठे यांचे देहदान करण्यात आले.
वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी आणि डॉ . रामन्नवर ट्रस्टचे सचिव डॉ. महांतेश रामन्नवर यांनी देहदान केल्याबद्दल होसपेठे कुटुंबियांचे आभार मानले. खवटकोप्प आणि शेगुणसीचे राष्ट्रीय बसवदलाच्या सदस्यांनी देहदानाची विधी पूर्ण केली. मल्लप्पा आळगौड होसपेठे यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. ज्यांना या पद्धतीने मरणोत्तर देहरूपाने या जगात अमररुपी राहायचे आहे अशा महानुभवानी देहदानाच्या अधिक माहितीसाठी डॉ . रामन्नवर ट्रस्ट ९२४२४९६४९७ या मोबाईल क्रमांकवर संपर्क करावा.









