संशयित युवक पोलिसांच्या ताब्यात
कणकवली : वार्ताहर
मुंबई पोलीस दलाचे निवृत्त कर्मचारी विनोद मधुकर आचरेकर (५५, मूळ कोळोशी व सध्या रा. भांडूप पूर्व- मुंबई) हे कोळोशी येथील घरात खून झालेल्या स्थितीत आढळून आले. ही घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती समजताच पोलिसांच्या विविध पथकांनी तातडीने घटनास्थळ गाठले. याप्रकरणी संशयित युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याचा कसून तपास सुरु आहे. घटनास्थळी ठसे तज्ज्ञ, श्वानपथक दाखल झाले आहे.









