ओटवणे | प्रतिनिधी
दाभिल येथील निवृत्त आरोग्य सहाय्यिका सुलभा रामचंद्र गवस (९१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. आरोग्य सेविका म्हणून रुजू झालेल्या सुलभा गवस यांनी त्यावेळच्या प्रतिकूल परिस्थितीत देवगड व मालवण तालुक्यात सेवा बजावली. त्यानंतर सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा, आरोस आदी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात सेवा बजावून निरवडे प्राथमिक आरोग्य केंद्रातून आरोग्य सहाय्यिका म्हणून त्या निवृत्त झाल्या. त्यांनी जबाबदारीसह प्रामाणिक व कर्तव्यदक्षतेने आरोग्य खात्यात सेवा बजावताना रुग्णांना समुपदेशन व औषध उपचारांसह मानसिक आधार देण्याचे काम केले. त्यांच्या पश्चात चार मुलगे, एक मुलगी, सुना, पुतणे, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. सारस्वत बँकेचे मुंबई व गोवा शाखेचे निवृत्त व्यवस्थापक शशिकांत गवस, औषध कंपनीतील निवृत्त कॉलिटी हेड विजय गवस, निवृत्त कृषी अधिकारी अनिल गवस, भारत पेट्रोलियमचे निवृत्त लॅब एनालिस्ट शैलेंद्र गवस तसेच सनातन साधक उषा निकम यांच्या त्या मातोश्री होत.
Previous Articleविद्युत वाहिनीच्या धक्क्याने प्रौढाचा जागीच मृत्यू
Next Article कराड शहराच्या विकासासाठी 10 कोटी मंजूर









