ओटवणे प्रतिनिधी
चराठा टेंबवाडी येथील सेवानिवृत्त वनपाल निळकंठ नारायण मेस्त्री (८०) यांचे रविवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. निळकंठ मेस्त्री यांनी वनखात्यात सुरुवातीला सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात काम केले. त्यानंतर त्यांनी दोडामार्ग तालुक्यासह कुडाळ नेरूर तसेच पडवे – माजगाव या ठिकाणी वनपाल म्हणून कर्तव्यदक्ष व प्रामाणिक सेवा बजावून निवृत्त झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत मेस्त्री कुटुंबीयांचे सांत्वन केले. सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामपंचायत कॉम्प्युटर सर्विस इंजिनीयर नारायण मेस्त्री यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सून जावई, नातवंडे असा परिवार आहे.









