१८ टेबलवर ९ फेऱ्यात निकाल पूर्ण होणार
वारणानगर / प्रतिनिधी
पन्हाळा तालुक्यात चाळीस ग्रामपंचायतीसाठी ८८.११ टक्के मतदान रविवार दि. १८ रोजी शांततेत पार पडले होते या निकालाची मामोजणी आज मंगळवार दि. २० रोजी पन्हाळा येथील नगरपालिका हॉल, मयुरबागेत होणार आहे १८ टेबलावर ९ फेरीत निकाल प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती पन्हाळा तालुक्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार रमेश शेडगे यानी दिली.
पन्हाळा तालुक्यातील ४० गावातील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी सरासरी ८८.११ टक्के मतदान झाले. एकूण ७२ हजार ६१८ पात्र मतदान होते यापैकी ३० हजार ५७८ स्त्रि मतदार व ३३४०३ पुरूष मतदार असे एकूण ६३९८१ मतदारानी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये नोटा या पर्यायाचा कोणत्याही गावात वापर झाला नाही.
पन्हाळा तालुक्यात ५० पैकी १० ग्रामपंचायतीच्या निवडणूका बिनविरोध पार पडल्या होत्या त्यामुळे ४० गावात १५६ मतदान केंद्रावर ही मतदान प्रक्रिया पार पडली होती.
मोठ्या लोकसंखेच्या गावात ८५ टक्यापर्यन्त मतदान झाले छोट्या गावात मतदानाची टक्केवारी ९६ टक्यापर्यन्त पोहचली होती निकाला बाबत अनेक गावात उत्सुकता आहे काही गावात सत्तातंर होण्याची शक्यता आहे.
मिरवणुका, कर्णकर्कश आवाजावर बंदी
ग्रामपंचायतीच्या निकाला वरून कोणीही आरोप प्रत्यारोप किंवा आक्षेपार्य विधाने करून शांतता बिघडवू नये, विजयी मिरवणूकावर बंदी आहे तसेच मोटर सायकल व इतर वाहनiचे सायलेन्सर काढून किंवा कर्णकर्कश आवाज करणारी वाहणांचे परवाणे जप्त करण्यात येणार आहेत तसेच जमावबंदी आदेशाचा भंग झालेस कारवाई करण्यात येणार आहे कायदा व सुव्यवस्थेसाठी कोडोली, कळे, पन्हाळा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्राला ४० गावात पोलीसानी चोख बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन केले आहे.
पन्हाळा तालुक्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार रमेश शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसिलदार, मंडल अधिकारी, गाव कामगार तलाठी, तसेच इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याने निवडणूकातील मतदान मोजणीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याचे नियोजन केले आहे.









