शालेय गटात‘अविस्मरणीय हॅपी डेज’,खुल्या गटात ‘तुम्ही ऑर नॉट टू मी’ अव्वल

प्रतिनिधी /बेळगाव
येथील कॅपिटल वन संस्थेतर्फे 9 आणि 10 जानेवारी रोजी आंतरराज्य एकांकिका स्पर्धा लोकमान्य रंगमंदिर येथे पार पडल्या. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेत सांघिक गटात राहुल मोहनदास प्रॉडक्शन बेळगावची ‘अविस्मरणीय डेज’ एकांकिका प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. द्वितीय क्रमांक महिला विद्यालय हायस्कूलची ‘सत्यम शिवम सुंदरम’ आणि तृतीय क्रमांक मराठी विद्यानिकेतन प्रस्तुत ‘किल्ल्यातील चेटकीण’ एकांकिकेने पटकावला. त्याचप्रमाणे खुल्या गटात राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इस्लामपूरची ‘तुम्ही ऑर नॉट टू मी’, द्वितीय क्रमांक कलासक्त मुंबईच्या ‘ओल्या भिंती एकांकिकेने तर तृतीय क्रमांक लोकरंगभूमी सांगलीच्या ‘शेवट तितका गंभीर नाही’ एकांकिकेने पटकावला.
संस्थेने आपल्या परिसरातून नाट्या कलाकार उदयास यावेत या हेतूने गेली अकरा वर्षे हे कार्य अविरतपणे चालू ठेवले आहे. संस्थेचे व्हा. चेअरमन शाम सुतार, डॉ. संध्या देशपांडे, परीक्षक देविदास आमोणकर, सुनील गुरव, राजीव जोशी उपस्थित होते. परीक्षक देविदास आमोणकर आणि डॉ. संध्या देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी संस्थेचे संचालक रामकुमार जोशी, शिवाजीराव अतिवाडकर, संजय चौगुले, शरद पाटील, सदानंद पाटील, भाग्यश्री जाधव, नंदा कांबळे, सुभाष सुंठणकर, मान्यवर व रसिक प्रेक्षक, स्पर्धक उपस्थित होते. एकूण 28 संघांमधून 14 संघांची अंतिम फेरीसाठी निवड केली होती. मंगळवारी स्पर्धेनंतर बक्षीस वितरण करण्यात आले. निकाल पुढीलप्रमाणे…











